Iphone 15 Smartphone:- गेल्या वर्षी अॅपलचा आयफोन 15 हा सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन ठरला आहे. यामध्ये अॅपलच्या आयफोन 16 प्रो मॅक्सला देखील ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मार्केट रिसर्च फर्म ॲनालिसच्या अहवालानुसार, आयफोन 16 सिरीजच्या यशामुळे अॅपलने 2024 च्या चौथ्या तिमाहीत स्मार्टफोन बाजारपेठेचा 23% हिस्सा मिळवला त्यामुळे त्याला पहिल्या स्थानावर ठेवले.
अॅपलचे सात मॉडेल्स टॉप १०
स्मार्टफोनमध्ये अॅपलने आपल्या आयफोनच्या विविध मॉडेल्ससह यादीत झेप घेतली आहे. यामध्ये आयफोन 15, आयफोन 16 प्रो मॅक्स आणि आयफोन 16 प्रो मॅक्स यांचा समावेश आहे.
जे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आयफोन 16 प्रो पाचव्या स्थानावर आहे. यामुळे अॅपलला जगभरातील स्मार्टफोन बाजारात प्रमुख स्थान मिळाले आहे.
सॅमसंग आणि शाओमीचा प्रतिस्पर्धा दक्षिण कोरियाची सॅमसंग कंपनी गॅलेक्सी ए15सह टॉप 5 स्मार्टफोनमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.सॅमसंगची शिपमेंट सुमारे 1 टक्क्यांनी कमी होऊन 221.9 दशलक्ष युनिट्सवर आली आहे.
तरीही ती स्मार्टफोन बाजारात दुसऱ्या क्रमांकावर आहे. शाओमी, ज्याची शिपमेंट 15 टक्क्यांनी वाढून 168.6 दशलक्ष युनिट्सवर पोहोचली असून तिसऱ्या स्थानावर आहे.
चीनमध्ये अॅपलला अडचणी
चीनमध्ये अॅपलच्या विक्रीत घट झाली आहे.याचे मुख्य कारण चीनमधील स्मार्टफोन कंपन्यांकडून होणारी तीव्र स्पर्धा आहे. आयफोनची विक्री गेल्या वर्षी 12% घटली. त्यामुळे अॅपलने आपल्या उत्पादन योजनांबाबत सावध भूमिका घेतली आहे.
अॅपल लवकरच एक नवीन, परवडणारा स्मार्टफोन लाँच करण्याची योजना बनवित आहे.ज्याबद्दल लीकमधून माहिती मिळाली आहे. या स्मार्टफोनचे मॉडेलचे नाव बदलू शकतो आणि आयफोन एसई 4 ऐवजी तो आयफोन 16ई म्हणून सादर होऊ शकतो.
अॅपलची भविष्यातील प्लॅनिंग
आयफोन 16 मालिकेच्या यशानंतर अॅपलने आपल्या उत्पादनांमध्ये नवीन फीचर्स आणि मॉडेल्स समाविष्ट करण्याची योजना आखली आहे. यासाठी त्यांना चीनमधील स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.