Apple MacBook Pro : Apple ने गेल्या महिन्यात आयफोन 15 सीरिज लाँच केली होती, पण कंपनीने अद्याप काही नवीन प्रोडक्ट अजून सादर केलेली नाहीत. अलीकडेच या कंपनीने अॅपल पेन्सिलचे खास व्हेरियंटही सादर केले आहे. आगामी मॅकबुक प्रो,
आयमॅक आणि आयपॅडवर आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. असे म्हटले जात आहे की लवकरच कंपनी एक लॉन्च इव्हेंट आयोजित करू शकते आणि प्रतीक्षा संपवू शकते.
अॅपलचे नवे प्रोडक्ट महिन्याच्या अखेरीस लाँच होण्याची शक्यता
ब्लूमबर्गने एका अहवालात म्हटले आहे की, अॅपल ऑक्टोबरच्या अखेरीस प्रॉडक्ट लाँच इव्हेंटची योजना आखत आहे. सध्या आयमॅक आणि मॅकबुक प्रो मॉडेल्सचा पुरवठा कमी आहे. रिपोर्टनुसार, नवीन आयमॅक 30 ऑक्टोबरला येणार आहे.
एम 1 चिप असलेला 24 इंचाचा अॅपल iMac एप्रिल 2021 मध्ये लाँच करण्यात आला होता. रिपोर्टनुसार नवीन आयमॅकमध्ये असणाऱ्या चिपचा अजून उलगडा केलेला नाही. 24 इंचाच्या अॅपल आयमॅकच्या रिफ्रेश व्हर्जनमध्ये M3 चिप असण्याची शक्यता आहे.
अॅपलच्या आगामी इव्हेंटकडून अपेक्षा
अॅपलने आपला 24 इंचाचा आयमॅक एप्रिल 2021 मध्ये लाँच केला होता. यात आयमॅक एम १ चिप देण्यात आली आहे. हे डिव्हाइस लाँच होऊन दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. अशा तऱ्हेने आयमॅकचे रिफ्रेश व्हर्जन सादर करण्याची अपेक्षा वाढते.
तथापि, अॅपल याला आयमॅक एम 3 चिप देईल की आगामी आयमॅकला विद्यमान एम 2 चिपचा आधार असेल हे पाहावे लागेल. आयमॅक यापुढे एम 2 चिपसह लाँच होणार नाही, त्यामुळे आगामी आयमॅक एम 3 चिप सोबत येईल अशी अपेक्षा आहे.
मॅकबुक प्रोबाबत बोलायचे झाले तर अॅपल आपल्या लॅपटॉपमध्ये काय बदल करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अॅपलने जानेवारी 2023 मध्ये एम 2 चिपसह 14 इंच आणि 16 इंच मॅकबुक प्रो मॉडेल लाँच केले होते. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की,
अॅपल या महिन्याच्या अखेरीस मॅक-सेंट्रिक डिव्हाइसशी संबंधित एक महत्वाचे प्रोडक्ट लाँच करण्याच्या तयारीत आहे. 14 इंच आणि 16 इंचाचे प्रो लॅपटॉपही जानेवारीत रिफ्रेश करण्यात आले होते. 2024 पर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे.
शिवाय, आगामी मॅकबुकमध्ये इंटरनल अपग्रेड आणि किरकोळ डिस्प्ले बदल व्यतिरिक्त इतर कोणत्याही मोठ्या बदलांची अपेक्षा नाही. नवीन आयमॅक प्रो 2025 मध्ये अनेक महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. यानंतर ओएलईडी मॅकबुक प्रो 2026 मध्ये सादर केले जाऊ शकतात, शक्यतो अद्ययावत डिझाइन आणि काही अतिरिक्त वैशिष्ट्यांसह ते लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.