Electric Scooter : जबरदस्त फीचर्स आणि उत्तम रेंज, ही आहे देशातील सर्वात महाग इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या..

Published on -

Electric Scooter : इलेक्ट्रिक वाहनांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. प्रत्येक कंपनी आपली इलेक्ट्रिक वाहने सादर करीत आहे. जर तुम्ही सुद्धा नवीन इलेक्ट्रिक स्कुटर घ्यायचा विचार करत असाल तर TVS ची ही इलेक्ट्रिक स्कूटर उत्तम पर्याय ठरेल. जाणून घ्या याच्या फीचर्स बद्दल.

टीव्हीएसची TVS X ही सध्या देशातील सर्वात महागडी इलेक्ट्रिक स्कुटर आहे. दरम्यान, ही स्कुटर XLETON प्लॅटफॉर्मवर आधारित असून, यात 19-लिटरची बूट स्पेस आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या गरजेच्या वस्तू ठेवू शकता. 175 मिमीच्या ग्राउंड क्लिअरन्ससह, 770 मिमी इतकी रायडर सीटची उंची आहे.

दरम्यान, सध्या बंगळुरूमध्ये TVS X ची एक्स-शोरूम किंमत 2,49,990 रुपये इतकी आहे. TVS X ला तीन रायडिंग मोड दिले गेले आहेत – Xtride, Xtealth आणि Xonic.

तसेच याची बॅटरी पॅकची क्षमता 4.44 kWh आहे, त्यापैकी 3.8 kWh वापरण्यायोग्य आहे. तर IDC ने TVS X ची रेंज 140 किमी असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या गाडीला चार्ज करण्यासाठी पोर्टेबल 950 डब्ल्यू चार्जर वापरला जाऊ शकतो.

ऍडव्हान्स फीचर्स

दरम्यान, ही स्कुटर टिल्ट-अॅडजस्टेबल 10.25-इंच टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह येते ज्यावर रायडर वॉलपेपर, थीम आणि प्रोफाइल देखील सेट करू शकतात. तर TVS ने अलेक्सा आणि अँटी थेफ्ट अलर्ट, फॉल अलर्ट, ऑटो लॉक, SOS सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये देखील या स्कुटरला दिली आहेत. एवढेच नव्हे तर या स्कुटरला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील आहे. या व्यतिरिक्त, गेम आणि व्हिडिओ पाहण्याची देखील सुविधा उपलब्ध केली आहे

जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कुटर घेण्याचा विचार करत असाल तर टीव्हीएसची ही स्कुटर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News