अबबब… एकदा चार्ज केल्यावर ही कार धावणार तब्बल ८०० किलोमीटर

सध्या जगात सर्वत्र इलेक्ट्रिक कारचा बोलबाला आहे. महागड्या इंधनाऐवजी स्वस्त विजेवर चालणाऱ्या कारला ग्राहकांकडून जास्त पसंती मिळत आहे. हेच ध्यानात ठेवून चीनच्या शाओमी कंपनीने एका चार्जमध्ये ८०० किलोमीटर धावणारी कार लाँच केली आहे.

इलेक्ट्रिक कारच्या भारतीय बाजारात सध्या टाटा कंपनीचा दबदबा आहे. या बाजारपेठेवर संपूर्ण जगाचा डोळा आहे. भारतात सर्वाधिक कार उत्पादन करणारी कंपनी म्हणजे टाटा. या कंपन्यांच्या तोडीस तोड अशा चीनच्या गाड्या आहेत.

सध्या चीनच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीतही मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होत आहे. स्फार्टफोनच्या माध्यमातून चालणाऱ्या या गाडीची टक्कर थेट टेस्लाशी आहे. याशिवाय बीवायडी या कंपनीनेही आपल्या कार भारतीय बाजारात आणण्याचे सूतोवाच केले आहे.

भारतात टाटा व्यतिरिक्त इतरही अनेक मोठ्या कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कार आणत आहेत, त्यामुळे भविष्यात टेस्ला सह इतरही अनेक ब्रॅण्डच्या गाड्या भारतीय रस्त्यावर धावताना आपल्याला दिसतील. तसेच भारतीय बाजारात बीवायडी आणि शाओमीची कार येणार आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe