Vodafone Idea : (Vi) ही भारतातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. अधिकाधिक ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंपनी नेहमीच अनेक चांगल्या ऑफर आणते. या ऑफर अंतर्गत वापरकर्त्यांना दररोज डेटा तसेच अधिक चांगल्या सोई मिळतात. पण आता कंपनीने आपल्या लोकप्रिय प्लॅनमधून अतिरिक्त डेटा फायदे बंद करणार आहे.
Vodafone Idea (Vi) कंपनीने 30 नोव्हेंबरपासून या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेला अतिरिक्त डेटा काढून टाकला आहे. आता तुम्ही विचार करत असाल की कोणत्या योजनेतून अतिरिक्त-डेटा लाभ हटवण्यात आला आहे.
कंपनीने नुकतीच ही ऑफर जाहीर केली होती, या ऑफर अंतर्गत, वापरकर्त्यांना 15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान प्रीपेड रिचार्ज प्लॅन सक्रिय केल्यावर हा अतिरिक्त डेटा लाभ मिळणार होता. तथापि, हा लाभ Rs 1449, Rs 2899 आणि Rs 3099 च्या प्लॅनवर देखील उपलब्ध होता.
Vodafone Idea चा हा प्लान 180 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 1.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत MSM मिळतात. याशिवाय प्लॅनमध्ये 50GB अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे.
Vodafone Idea चा हा प्लान 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 1.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत MSM मिळतात. याशिवाय प्लानमध्ये 75GB अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे.
Vodafone Idea चा हा प्लान 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत MSM ची सुविधा मिळते. याशिवाय प्लानमध्ये 75GB अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे. यासोबतच डिस्ने हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी उपलब्ध आहे.
लक्षात ठेवा की प्लॅनसह उपलब्ध असलेले मोफत डेटा फायदे, 30 नोव्हेंबरपर्यंत वैध होते, जर तुम्ही हा प्लान 1 डिसेंबरला घेतला तर तुम्हाला अतिरिक्त डेटा लाभ मिळणार नाहीत.