सावध व्हा ! तुमच्याही एसीचा होऊ शकतो स्फोट; ‘या’ चुका टाळण्याचा सल्ला एक्सपर्ट देतात

Published on -

उन्हाळा लागला की, अनेकजण एसी खरेदी करतात. उन्हाळा काढायचा म्हणजे, एसी लागतोच. कारण गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. एप्रिल-मे महिन्याच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रासह भारतात उष्णतेच्या लाटा सुरु झाल्या. अशा परिस्थितीत कडक उन्हापासून आराम मिळवण्यासाठी लोक एसीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. परंतु एसीचे स्फोट झाल्याच्या बातम्याही अनेकदा येतात. तर आज आपण एसीचा स्फोट का होतो, या प्रश्नाचे उत्तर शोधूयात…

ACचा स्फोट का होतो?

1. कंप्रेसर जास्त गरम झाल्यामुळे- तुमचा एसी स्प्लिट असो किंवा विंडो, त्याचा कंप्रेसर त्याचे हृदय असते. अशा परिस्थितीत देखभालीअभावी, ते जास्त गरम होऊ शकते आणि स्फोट होण्याची शक्यता असते. म्हणजेच कंप्रेसर गरम झाल्यावर एसीचा स्फोट होतो.
2. शॉर्ट सर्किटमुळे- वायरिंगमधील बिघाडांमुळे देखील स्फोट होऊ शकतो. तुमचा एसी वापरण्यापूर्वी, तो नेहमी चेक करा.

काय काळजी घ्यावी?

जर तुम्ही या कडक उन्हात एसी वापरताना या चुका केल्या तर तुमचा एसी बॉम्बसारखा फुटू शकतो. तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. तुम्ही अती उष्णतेमध्ये एसी वापरत असाल तर त्याचे तापमान सुज्ञपणे सेट करणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा असे घडते की आपला एसी थंड होत नाही आणि आपण एसीचे
तापमान कमी करत राहतो. त्याचा थेट परिणाम एसी कंप्रेसरवर होतो. यामुळे तुम्हाला थंड हवा मिळू शकते, तरीही एसीला नुकसान होण्याचा धोका कायम राहतो. अशा परिस्थितीत, एसी जास्त गरम होऊ शकतो आणि स्फोट देखील होऊ शकतो.

सर्व्हिसिंगही महत्त्वाची

बऱ्याचदा असे घडते की तुमचा एसी सदोष वायरिंग, अयोग्य कनेक्शन किंवा शॉर्ट सर्किटमुळे स्फोट होऊ शकतो. एअर कंडिशनरच्या गॅस सिस्टीममध्ये गळती झाली आणि गॅस कोणत्याही ज्वलनशील वस्तूच्या संपर्कात आला तर स्फोट होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही तुमचा एसी नियमितपणे सर्व्हिसिंग करायला हवा. शिवाय तो कंपनीच्या तज्ज्ञांकडूनच सर्व्हिंसींग व्हावा. कारण त्या-त्या कंपनीच्या इंजिनिअरला त्यांच्या एसीतले सगळे नाँलेज असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News