Best Battery Backup Smartphones in India : आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, बॅटरी लवकर संपल्याने अनेकांना अडचणी येतात. त्यामुळे फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या स्मार्टफोन्सची मागणी वाढली आहे. जर तुम्ही असा स्मार्टफोन शोधत असाल जो काही मिनिटांत पूर्ण चार्ज होईल, तर येथे आम्ही 120W फास्ट चार्जिंग असलेल्या टॉप 5 स्मार्टफोन्सची यादी दिली आहे.
1. iQOO 12 5G
ह्या यादीतील पहिला स्मार्टफोन आहे iQOO 12 5G हा 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेला आणखी एक दमदार स्मार्टफोन आहे. यामध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते. LTPO AMOLED डिस्प्ले आणि 144Hz रिफ्रेश रेटमुळे हा फोन गेमिंगसाठी उत्कृष्ट आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 50MP फ्रंट सेन्सर, 50MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 64MP पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स आहे. Amazon वर हा फोन ₹45,995 मध्ये उपलब्ध आहे.

2. Realme GT 7 Pro
Realme GT 7 Pro हा उत्कृष्ट फास्ट चार्जिंग स्मार्टफोन आहे. यात 5800mAh बॅटरी असून ती 120W चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीच्या दाव्यानुसार, हा फोन अवघ्या 14 मिनिटांत 50% चार्ज होतो. तसेच, 50MP फ्रंट सेन्सर, 8MP वाइड अँगल लेन्स आणि 50MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा (120x डिजिटल झूम) मिळतो. Flipkart वर हा फोन ₹54,999 मध्ये उपलब्ध आहे.
3. Redmi Note 13 Pro+
बजेटमध्ये उत्तम फास्ट चार्जिंग स्मार्टफोन हवा असेल, तर Redmi Note 13 Pro+ हा चांगला पर्याय आहे. यामध्ये 5000mAh बॅटरी असून 120W हायपर चार्जिंग सपोर्ट आहे. कंपनीच्या माहितीनुसार, हा फोन फक्त 19 मिनिटांत 100% चार्ज होतो. याशिवाय, 200MP प्राथमिक कॅमेरा उत्तम फोटोग्राफी अनुभव देतो. Flipkart वर हा फोन ₹22,310 मध्ये उपलब्ध आहे.
4. Realme GT 6T
Realme GT 6T मध्ये 5500mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कॅमेरा विभागात 50MP फ्रंट कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 32MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Flipkart वर हा फोन ₹25,318 मध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
5. iQOO 13
iQOO 13 मध्ये 6000mAh बॅटरी असून 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट आहे. हा फोन फक्त 22 मिनिटांत 100% चार्ज होतो. यामध्ये 50MP Sony IMX921 फ्रंट सेन्सर, 50MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 50MP टेलिफोटो लेन्स आहे. तसेच, 32MP फ्रंट कॅमेरा सेल्फी लव्हर्ससाठी उत्तम पर्याय आहे. Amazon वर हा स्मार्टफोन ₹54,999 मध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
कोणता स्मार्टफोन चांगला
जर तुम्हाला वेगवान चार्जिंग आणि उत्तम परफॉर्मन्स असलेला स्मार्टफोन हवा असेल, तर वरील पर्याय तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतात. बजेटमध्ये Redmi Note 13 Pro+ हा सर्वात स्वस्त 120W फास्ट चार्जिंग स्मार्टफोन आहे, तर iQOO 12 5G आणि Realme GT 7 Pro हे प्रीमियम वैशिष्ट्यांसह येतात. तुमच्या बजेट आणि गरजेनुसार योग्य स्मार्टफोन निवडा!