Best Smartphone Under 15000 : मागणीनुसार बाजारात वेगवेगळे स्मार्टफोन लाँच होत आहेत. या प्रत्येक स्मार्टफोनमध्ये फीचर्स आणि स्पेसिफिकेशन वेगवेगळे देण्यात येतात. जसे याचे फीचर्स वेगळे असतात तशी त्याची किंमतही वेगळी असते.
प्रत्येकाचे बजेट जास्त असतेच असे नाही. काहींचे स्मार्टफोनचे बजेट खूप कमी असते. परंतु आता बजेट कमी असेल तर काळजी करू नका. कारण आता तुम्ही 15 हजारांपेक्षा कमी किमतीत 5G स्मार्टफोन खरेदी करू शकता. पहा त्यांची सविस्तर यादी.
Realme Narzo 30 5G
जर किमतीचा विचार केला तर या स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये इतकी आहे. यात तुम्हाला ट्रिपल रिअर कॅमेरा (48MP 2MP 2MP) सेटअप आणि 16MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा फोन 5000 mAh बॅटरी आणि MediaTek Dimensity 700 (MT6833) प्रोसेसरद्वारे समर्थित असेल.
Infinix Hot 30 5G
Infinix चा हा स्मार्टफोन 4GB 128GB आणि 8GB 128GB अशा दोन स्टोरेज प्रकारांमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल. Flipkart वर या दोन्ही प्रकारांची किंमत अनुक्रमे 12,499 रुपये आणि 13,499 रुपये इतकी आहे. तर या फोनमध्ये 6.78 इंच फुल एचडी डिस्प्ले आणि 6000mAh ची शक्तिशाली बॅटरी कंपनीकडून वापरकर्त्यांसाठी देण्यात आली आहे. हे Dimensity 6020 5G प्रोसेसरद्वारे समर्थित असून कॅया फोनला फोटोग्राफीसाठी 50 MP AI लेन्स मिळत आहे. तर यामध्ये सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.
Motorola G52
हा मोटोरोला चा स्मार्टफोन 6.6 इंच डिस्प्ले आणि 5000mAh लिथियम बॅटरीसह तुम्हाला खरेदी करता येईल. हा फोन Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरद्वारे समर्थित असून तो 6GB RAM आणि 128GB स्टोरेजसह जोडला आहे. तर फ्लिपकार्टवर या फोनची किंमत 13,999 रुपये इतकी आहे.
सॅमसंग गॅलेक्सी F22
समजा तुम्ही सॅमसंगचे चाहते असाल आणि 15 हजारांपेक्षा स्वस्तात नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास तर तुमच्यासाठी Galaxy F22 हा एक चांगला पर्याय असेल. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 13,499 रुपये इतकी असून यामध्ये 48MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी आणि MediaTek Helio G80 प्रोसेसर देण्यात आला आहे.
Redmi 10 prime
Redmi च्या स्मार्टफोनची किंमत 14,490 रुपये आहे. हे Helio G88 प्रोसेसरद्वारे समर्थित असून यात 6GB RAM आणि 128GB स्टोरेज दिले आहे यामध्ये, कॅमेरा फ्रंटवर मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा (50MP 8MP 2MP 2MP) सेटअप उपलब्ध आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. हा फोन 6000 mAh बॅटरीसह सुसज्ज आहे.