Best Waterproof Smartphone : तुम्हीही नवा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित आहात का? मग आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. खर तर अनेकजण चांगल्या बिल्ड क्वालिटीचे स्मार्टफोन घेऊ इच्छितात. पण चांगल्या बिल्ड क्वालिटीचे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी मोठा पैसा खर्च करावा लागतो तसे अनेकांना वाटते.
पण अलीकडे अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी कमी किमतीत चांगल्या क्वालिटीचे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. विशेष म्हणजे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाइन शॉपिंग साइटवर सध्या सेल सुरु आहेत. यात ग्राहकांना कमी किमतीत चांगले स्मार्टफोन मिळत आहेत.

फ्लिपकार्टच्या बिग बिलीयन सेल मध्ये ग्राहकांना कमी किमतीत चांगल्या फीचरचे स्मार्टफोन मिळत आहेत. या सेलमध्ये वीस हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत वॉटरप्रूफ IP 68, IP 69 रेटेड फोन उपलब्ध झाले आहेत.
यामुळे जर तुम्हाला वॉटरप्रूफ स्मार्टफोन कमी किमतीत घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे. आता आपण या सेलमध्ये 20000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असणाऱ्या वॉटरप्रूफ स्मार्टफोन बाबत माहिती पाहूयात.
हे आहेत बेस्ट स्मार्टफोन
Motorola G96 5G – हा फोन IP-68 रेटिंगसह येतो. महत्त्वाची बाब म्हणजे सेलमध्ये हा स्मार्टफोन ग्राहकांना 15,999 रुपयांना मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बँकेचा डिस्काउंट ऑफरचा पण लाभ मिळणार आहे.
पोको एक्स7 प्रो – वॉटरप्रूफ स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर हा एक बेस्ट ऑप्शन राहणार आहे. या पोको फोनला आयपी66, आयपी68 आणि आयपी69 रेटिंग देण्यात आली आहे. त्यामुळे पाण्यात पडल्यामुळे किंवा पावसात या स्मार्टफोनचे कोणतेच नुकसान होणार नाही. सेलमध्ये याची किंमत वीस हजार 999 रुपये एवढी आहे. तसेच यावर बँक ऑफर्स सुद्धा मिळतात.
Vivo T4R 5G – हा स्टायलिश स्मार्टफोन वॉटरप्रूफ आहे. याला IP68 आणि IP69 रेटिंग देण्यात आलीये. या या डिवाइस मध्ये तुम्हाला अंडरग्राउंड फोटोग्राफीचा ऑप्शन देण्यात आला आहे. त्याला मिलिट्री ग्रेड SGS 5-स्टार प्रमाणपत्र सुद्धा मिळाले आहे. सेल मधील डिस्काउंट ऑफर आणि बँक ऑफर्सनंतर याची किंमत वीस हजार रुपयांपेक्षा कमी होते.
Realme P3 प्रो – ह्या फोनला IP68, IP66 आणि IP69 रेटिंग देण्यात आली आहे. अर्थात वॉटरप्रूफ स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी हा सुद्धा बेस्ट ऑप्शन असेल. हा स्मार्टफोन सेलमध्ये 17 हजार रुपयांना मिळतोय.