iQOO Smartphone : बहुप्रतीक्षित iQOO 11 सिरीज लॉन्च बाबत मोठी माहिती समोर आली आहे. iQOO 11 सिरीज ही 2 डिसेंबर रोजी टेक मार्केटमध्ये लॉन्च होणार होती. मात्र, चीनचे माजी अध्यक्ष जियांग झेमिन यांच्या निधनामुळे, IQOO 11 मालिका लॉन्च रद्द करण्यात आली, आणि लॉन्चची तारीख पुढे ढकलली गेली.
आता नुकतीच या स्मार्टफोनच्या लॉन्चची तारीख पुन्हा समोर आली आहे. कंपनीने आता घोषणा केली आहे की, iQOO 11 सिरीज आता 8 डिसेंबर रोजी इंडोनेशियामध्ये लॉन्च केली जाईल, या अंतर्गत iQOO 11 5G आणि iQOO 11 Pro 5G फोन बाजारात आणले जाऊ शकतात.

“या” दिवशी होणार iQOO 11 5G फोन
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार iQOO 11 5G सिरीज 8 डिसेंबर रोजी इंडोनेशियामध्ये लॉन्च केली जाईल. कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर iQOO 11 मालिका लॉन्च बाबत माहिती शेअर केली आहे. ही स्मार्टफोन मालिका 8 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता टेक प्लॅटफॉर्मवर प्रवेश करेल, जी भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता असेल.
कंपनीने आपल्या टीझरमध्ये फक्त iQOO 11 5G फोनचा उल्लेख केला आहे, त्यामुळे 8 डिसेंबर रोजी फक्त iQOO 11 5G फोन लॉन्च केला जाईल आणि iQOO 11 Pro 5G फोन लॉन्च केला जाणार नाही.
iQOO 11 5G वैशिष्ट्ये
IQ 11 बद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये मोठा 6.67-इंचाचा E6 AMOLED डिस्प्ले असेल, जो फुलएचडी पिक्सेल रिझोल्यूशनला सपोर्ट करेल आणि 144Hz रिफ्रेश रेटवर काम करेल. प्रोसेसिंगसाठी, iQOO 11 5G फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, या स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 120 W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल.
iQOO 11 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा दिसू शकतो. या कॅमेरा सेटअपमध्ये, 50MP Samsung GN5 प्राथमिक सेन्सरसह 13 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 13 मेगापिक्सेल पोर्ट्रेट टेलीफोटो लेन्स पाहता येतील. लीक्सनुसार, हा स्मार्टफोन 16 जीबी रॅमवर लॉन्च केला जाऊ शकतो, ज्यामध्ये 512 जीबी स्टोरेज दिले जाऊ शकते.