Recharge Plans : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन योजना लॉन्च केली आहे. या प्लानची किंमत 499 रुपये आहे. हा कंपनीचा नवीन ब्रॉडबँड प्लान आहे, जो कंपनीने फायबर बेसिक नावाने सादर केला आहे.
आधी कंपनी फायबर बेसिक अंतर्गत 449 रुपयांचा प्लान देत होती, पण आता टेलिकॉम कंपनीने फायबर बेसिक नावाने 499 रुपयांचा प्लान आणला आहे. 449 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर ते आता Fiber Basic NEO म्हणून ओळखले जाईल. नवीन आणि जुन्या दोन्ही प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांविषयी जाणून घेऊया.
BSNL ने त्यांच्या ब्रॉडबँड पोर्टफोलिओमध्ये 499 रुपयांचा फायबर बेसिक प्लॅन जोडला आहे. कंपनीने 499 रुपयांचा प्लान आणण्याची ही पहिली वेळ नाही. कंपनीने याआधीही 499 रुपयांचा ब्रॉडबँड प्लान आणला आहे, मात्र यावेळी हा प्लॅन बऱ्याच दिवसांनी लॉन्च करण्यात आला आहे. 499 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये तुम्हाला कोणते फायदे दिले जातील ते जाणून घेऊ या.
BSNL Rs 499 फायबर बेसिक प्लॅन
BSNL कंपनीचा हा 499 रुपयांचा प्लान वापरकर्त्यांना 3300GB FUP डेटा देतो. त्याचा इंटरनेट स्पीड ४० एमबीपीएस आहे. यासोबत लोकल आणि एसटीडी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. डेटा कोटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 4 एमबीपीएसपर्यंत घसरतो. लॉन्च ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, वापरकर्त्याला पहिल्या महिन्याच्या बिलावर 90% पर्यंत सूट मिळेल.
BSNL Rs 449 फायबर बेसिक प्लॅन
दुसरीकडे, BSNL चा 449 रुपयांचा प्लान वापरकर्त्यांना 3300GB FUP डेटा देखील प्रदान करतो. फरक म्हणजे त्याचा इंटरनेट स्पीड. या प्लानमध्ये यूजर्सला 30 Mbps स्पीड मिळेल. यासोबत लोकल आणि एसटीडी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. डेटा कोटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 4 एमबीपीएसपर्यंत घसरतो. लॉन्च ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, वापरकर्त्याला पहिल्या महिन्याच्या बिलावर 90% पर्यंत सूट मिळेल.
15 नोव्हेंबरपासून या योजना बंद होणार आहेत
BSNL कंपनी 15 नोव्हेंबरपासून 2 प्लॅन बंद करणार आहे. या प्लॅनची किंमत 275 आणि 775 रुपये आहे. हे दोन्ही BSNL चे ब्रॉडबँड प्लॅन आहेत, जे या 15 नोव्हेंबर पर्यंत वैध असतील.