BSNL Recharge Plan : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) जरी आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा जास्त प्लॅन ऑफर करते, परंतु कधीकधी कंपनी अशा काही योजना देखील ऑफर करते, जे इतर कोणत्याही कंपनीकडे नसतात. काही ग्राहक मासिक रिचार्जमुळे त्रासलेले आहेत आणि त्यांना एक वेळ रिचार्ज करून संपूर्ण वर्षभर विश्रांती मिळवायची आहे. अशा ग्राहकांसाठी, BSNL एक उत्तम योजना ऑफर करते, जी हाय-स्पीड डेटासह येते. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली फ्री एसएमएसचाही फायदा मिळतो.
होय, येथे आम्ही बीएसएनएलच्या ७९७ रुपयांच्या शानदार प्लानबद्दल बोलत आहोत. या प्लॅनची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची वैधता एक वर्ष आहे. चला जाणून घेऊया या प्लानची सर्व माहिती…
बीएसएनएलचा 797 रुपयांचा रिचार्ज प्लान प्रत्येक अर्थाने खूप खास आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2GB हायस्पीड इंटरनेट डेटा दिला जातो. त्याच्या खास वैशिष्ट्याबद्दल बोललो, तर 797 रुपयांचा हा प्लान एका वर्षाच्या वैधतेसह येतो. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यावर ग्राहक ३६५ दिवस टेन्शनशिवाय राहू शकतात.
हाय-स्पीड इंटरनेट डेटा मिळवा
इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहकांना दररोज 100 एसएमएसचा लाभ दिला जातो. यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB इंटरनेट डेटा मिळतो आणि मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 80Kbps पर्यंत घसरतो.
797रुपयांचा हा प्लान सर्व सर्कलमध्ये उपलब्ध आहे आणि ऑनलाइन पोर्टल, बीएसएनएल सेल्फकेअर अॅप आणि गुगल पे, पेटीएमसह इतर अनेक प्लॅटफॉर्मवरून रिचार्ज केला जाऊ शकतो.