Budget Smartphones : बजेट कमी आहे टेन्शन नाही… हे आहेत 15 हजारांपेक्षा कमी किमतीतील 5G स्मार्टफोन, पहा यादी

Budget Smartphones

Budget Smartphones : नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी गेले असता त्या स्मार्टफोनच्या किमती जास्त असल्याने कमी बजेट असलेल्या ग्राहकांना ते खरेदी करता येत नाहीत. मात्र जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुमचेही बजेट 15 हजार रुपये असेल तर तुम्ही देखील शानदार स्मार्टफोन खरेदी करू शकता.

भारतात अनेक कंपन्यांनी कमी बजेट असणाऱ्या ग्राहकांचा विचार करता अनेक स्मार्टफोन सादर केले आहेत. त्यामुळे ग्राहक 10 हजार ते 15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये एक शक्तिशाली स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

अनेकजण बाजारात कमी किमतीमधील स्मार्टफोन शोधत असतात. मात्र त्यांना कमी बजेटमधील स्मार्टफोन सापडत नाहीत. मात्र तुम्हाला 10 ते 15 हजार रुपयांच्या किमतीतील स्मार्टफोन कोणते आहेत ते सांगणार आहोत.

Samsung Galaxy M14 5G

तुमचेही बजेट कमी आहे आणि तुम्हाला सॅमसंग कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही Galaxy M14 5G स्मार्टफोनचा पर्याय निवडू शकता. या स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात येत आहे.

Galaxy M14 5G या स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात येत आहे. तसेच 4GB + 128GB स्टोरेज पर्याय देण्यात येत आहे. या स्मार्टफोनची किंमत 14,999 रुपये आहे.

POCO M4 5G

स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुमचेही बजेट 15 हजार रुपयांच्या आत असेल तर तुम्ही Poco M4 5G स्मार्टफोनचा पर्याय निवडू शकता. 4GB RAM + 64GB स्टोरेज असेलल्या POCO M4 5G स्मार्टफोनची किंमत 12,999 रुपये आहे.

POCO M4 5G या स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.58-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात येत आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात येत आहे.

iQOO Z6 Lite 5G

कमी बजेट असणाऱ्या ग्राहकांसाठी iQOO Z6 Lite 5G हा स्मार्टफोन सर्वोत्तम पर्याय आहे. हा स्मार्टफोन 15 हजार रुपयांच्या कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे. 6GB + 128GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 14,499 रुपये आहे.

iQOO Z6 Lite 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.58-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात येत आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात येत आहे.

Infinix Hot 30 5G

कमी बजेट स्मार्टफोन खरेदीदारांसाठी Infinix Hot 30 5G हा स्मार्टफोन उत्तम पर्याय आहे. 4GB + 128GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 12,499 रुपये आहे आणि 8GB + 128GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 13,499 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी देण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe