Amazon वर OnePlus फोनवर बंपर डील, बघा संपूर्ण तपशील

100W चार्जिंग, 50MP कॅमेरा असणाऱ्या OnePlus Nord CE4 वर सध्या जबरदस्त ऑफर दिली जात आहे. Amazon वर ही सूट सरू असून या ऑफरचा लाभ किती तारखेपर्यंत घेणार येणार, ते पाहुयात-

Published on -

OnePlus Nord CE4 | वन प्लसने आपल्या Nord CE4 स्मार्टफोनवर जबरदस्त सूट आणि ऑफर्स जाहीर केल्या आहेत. जर तुम्ही 25,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत प्रीमियम फीचर्स असलेला स्मार्टफोन शोधत असाल, तर Amazon वरची ही डील तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकते.

किंमत आणि ऑफर

8GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या OnePlus Nord CE4 ची किंमत 23,998 रुपये ठेवण्यात आली आहे. बँक ऑफर अंतर्गत ग्राहकांना 2,000 चा इंस्टंट डिस्काउंट दिला जात आहे. याशिवाय, कंपनी 720 पर्यंत कॅशबॅकही देत आहे. जर तुमच्याकडे एक्सचेंजसाठी जुना फोन असेल, तर तुम्हाला 22,700 पर्यंतचा फायदा मिळू शकतो. मात्र, एक्सचेंजचा प्रत्यक्ष लाभ जुन्या फोनची स्थिती आणि ब्रँडवर अवलंबून असेल.

फीचर्स आणि वैशिष्ट्ये

या फोनमध्ये 6.7 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे, जो 2412×1080 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यामध्ये 1100 निट्स पर्यंतचा पीक ब्राइटनेस आहे, जो डायरेक्ट सनलाइटमध्येही उत्तम व्हिजिबिलिटी देतो.

फोनमध्ये Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी योग्य आहे. 8GB रॅमसह 256GB स्टोरेज मिळते, ज्यामुळे स्पेसची चिंता न करता तुम्ही तुमचे फोटोज, अ‍ॅप्स आणि मीडिया सहज सेव्ह करू शकता.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सरचा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी, 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, जो व्हिडिओ कॉल्ससाठीही उपयुक्त आहे.

बॅटरी क्षमतेबाबत बोलायचं झालं, तर यात 5500mAh बॅटरी आहे जी 100W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांत फोन चार्ज होतो. OS बाबतीत, OnePlus Nord CE4 Android 14 वर आधारित OxygenOS 14 वर चालतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह बायोमेट्रिक सिक्युरिटीचा पर्यायही उपलब्ध आहे. हा फोन Celadon Marble आणि Dark Chrome या दोन आकर्षक रंगांत उपलब्ध आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe