Samsung Galaxy : भारतीय मार्केटमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय फोन म्हणजे सॅमसंगचे फोन. कपंनी प्रत्येक बजेट मधले फोन मार्केटमध्ये सादर करत असते, अशातच तुम्हीही सॅमसंग फोनचे चाहते असाल आणि नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
देशातील दुसऱ्या नंबरची शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टने अनेक डिस्काउंटसह सॅमसंगचे फोन सादर केले आहेत. या ऑफरमध्ये तुम्ही सॅमसंगचे फोन 12 हजार रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. या डीलमध्ये बँक ऑफर आणि जबरदस्त कॅशबॅक देखील दिला जात आहे. याशिवाय तुम्ही सॅमसंगचे फोन आकर्षक एक्सचेंज डीलमध्येही खरेदी करू शकता. लक्षात ठेवा की एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट तुमच्या जुन्या फोनची स्थिती, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.
Samsung Galaxy F14 5G
6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 11,990 रुपये आहे. तुम्ही सेलमध्ये फोन खरेदी करण्यासाठी Flipkart Axis Bank कार्ड वापरल्यास, तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही या फोनची किंमत आणखी 11,000 रुपयांनी कमी करू शकता. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. त्याचा मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा आहे. फोनमध्ये तुम्हाला 6000mAh ची बॅटरी पाहायला मिळेल.
Samsung Galaxy F15 5G
4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या फोनच्या वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. तुम्ही ते 1,000 रुपयांच्या डिस्काउंटसह सेलमध्ये खरेदी करू शकता. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एचडीएफसी बँकेच्या कार्डद्वारे ईएमआय व्यवहार करावा लागेल. फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही Flipkart Axis Bank कार्ड वापरल्यास, तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक देखील मिळेल. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनी या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देत आहे. त्याचा मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. फोनची बॅटरी 6000mAh आहे. हा फोन MediaTek Dimension 6100 प्रोसेसरवर काम करतो.
Samsung Galaxy F34 5G
सॅमसंगचा हा फोन या डीलमध्ये 12,999 रुपयांना उपलब्ध आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह या फोनवर 5 टक्के कॅशबॅक देखील दिला जात आहे. या कॅशबॅकसाठी तुम्हाला फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डद्वारे पेमेंट करावे लागेल. कंपनी या फोनवर 10,100 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील देत आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये तुम्हाला 6.5 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले मिळेल. त्याचा मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. त्याची बॅटरी 6000mAh आहे.