Dolby Sound Smart TVs | जर तुम्ही स्वस्तात दर्जेदार आणि डॉल्बी साउंडसह एलईडी टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सध्या मार्केटमध्ये 11,500 पेक्षा कमी किमतीत तीन उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. हे टीव्ही 32 इंच डिस्प्लेसह येतात आणि त्यामध्ये HD Ready रिझोल्यूशन, डॉल्बी ऑडिओ, स्मार्ट फीचर्स, आणि 1 वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे. यामध्ये Redmi , JVC , आणि TCL या नामांकित ब्रँड्सचा समावेश आहे. चला तर पाहूया हे टॉप 3 मॉडेल्स.
Redmi F Series Smart Fire TV (32 inch)
Redmi चा हा टीव्ही Amazon India वर 11,499 मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 1366×768 पिक्सेल HD Ready डिस्प्ले मिळतो जो 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. आवाजासाठी यामध्ये 20W साउंड आउटपुटसह Dolby Audio आणि DTS Virtual:X सपोर्ट दिला आहे. ड्युअल बँड Wi-Fi, Bluetooth 5.0, आणि 2 HDMI पोर्ट्ससह हा टीव्ही कनेक्टिव्हिटीसाठी चांगला पर्याय आहे. याला मेटल बेजेललेस डिझाइन असून 1 वर्षाची वॉरंटी मिळते.

JVC AI Vision QLED Android TV (32 inch)
10,999 मध्ये उपलब्ध असलेला JVC ब्रँडचा हा स्मार्ट टीव्ही उत्कृष्ट पिक्चर आणि ऑडिओ क्वालिटीसाठी ओळखला जातो. यामध्ये HD Ready डिस्प्ले (1366×768 pixels), 1GB RAM आणि 8GB स्टोरेज मिळते. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे 48W साउंड आउटपुटसह Dolby Digital Plus सपोर्ट. यात Google Assistant ची सुविधा असून Android बेस्ड इंटरफेस आहे. 1 वर्षाची वॉरंटी यावर देखील दिली जाते.
TCL Metallic Bezel-less Android TV (32 inch)
ही यादीतील सर्वात स्वस्त मॉडेल म्हणजे TCL चा टीव्ही ज्याची किंमत केवळ 9,490 आहे. यामध्ये 32 इंचाचा HD Ready डिस्प्ले (HDR10 सपोर्टसह) दिला आहे. TCL च्या या टीव्हीमध्ये AI Clarity फीचर देखील आहे. ऑडिओसाठी 16W साउंड आउटपुटसह Dolby Audio सपोर्ट आहे. तसेच, 1GB RAM आणि 8GB स्टोरेज मिळते. यावर देखील 1 वर्षाची वॉरंटी आहे.
हे तीन टीव्ही कमी किमतीत जबरदस्त फिचर्ससह येतात आणि गृहउपयोगासाठी एकदम परफेक्ट पर्याय आहेत. जर तुम्हाला बजेटमध्ये स्मार्ट आणि Dolby साउंडचा टीव्ही हवा असेल, तर ही मॉडेल्स एकदा नक्की तपासा.