Cheapest Airtel Plan : देशाची दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असणाऱ्या एअरटेलने ग्राहकांना मोठा धक्का देत आपला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन बंद केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो एअरटेलने मोठा निणर्य घेत लोकप्रिय ठरणारा 99 रुपयांचा रिचार्ज प्लॅन बंद केला आहे.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि आता हा प्लॅन महाराष्ट्रसह 19 सर्किलमध्ये उपलब्ध असणार नाही. कंपनीच्या या निर्णयानंतर ग्राहकांना एअरटेलच्या बेस प्लॅनसाठी 155 रुपये मोजावे लागणार आहेत. हे लक्षात घ्या कि नोव्हेंबर 2022 च्या सुरुवातीपासून एअरटेलने 99 रुपयांचा प्लान हळूहळू बंद करण्यास सुरुवात केली होती . सर्वप्रथम हे रिचार्ज ओडिशा आणि हरियाणामध्ये बंद करण्यात आले. यानंतर एअरटेलचा हा सर्वात स्वस्त प्लॅन आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, कर्नाटक, राजस्थान आणि ईशान्य सर्कलमधील रिचार्ज लिस्टमधून काढून टाकण्यात आला होता .
आता असे दिसते आहे की कंपनी सर्व सर्कलमधून आपला बेस प्लॅन फेज आउट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि एअरटेल त्याच्या रिचार्ज पोर्टफोलिओमधून हळूहळू महाराष्ट्र आणि केरळमध्ये हा रिचार्ज प्लॅन बंद झाल्याचा अर्थ असा आहे की आता वापरकर्त्यांना त्यांचे सिम कार्ड सक्रिय ठेवण्यासाठी किमान 155 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल.
99 Rupees Airtel Plan
99 रुपयांचा एअरटेल रिचार्ज 99 रुपयांचा टॉकटाइम ऑफर करतो आणि वापरकर्ते 2.5 पैसे प्रति सेकंद दराने कॉलसाठी पैसे देतात. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे आणि यामध्ये 200MB डेटा देण्यात आला आहे. हा रिचार्ज इतर कोणत्याही फायद्यांसह येत नाही आणि सिम कार्ड सक्रिय ठेवण्यासाठी उपलब्ध असलेली सर्वात कमी रिचार्ज योजना आहे.
155 Rupees Airtel Plan
एअरटेलच्या 155 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची वैधता 24 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये 1GB डेटा, 300 SMS सारख्या सुविधा उपलब्ध आहेत. हा रिचार्ज अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह येतो. आणि या एअरटेल प्लॅनमध्ये Wynk Music आणि Hellotunes सारखे अतिरिक्त फायदे देखील उपलब्ध आहेत.
हे पण वाचा :- ATM Withdraw : भारीच .. आता एटीएम कार्डची गरज नाही ! ‘या’ पद्धतीचा वापर करून फोनद्वारे काढा पैसे