तुमच्या भागात Jio की Airtel बेस्ट? एका क्लिकवर मिळवा तुमच्या भागातील नेटवर्कची माहिती

आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र कितीही चांगला प्रोसेसर किंवा जास्त रॅम असलेला फोन असला तरी जर नेटवर्क कनेक्टिव्हिटी चांगली नसेल तर त्याचा उपयोग कमीच ठरतो.

Ratnakar Ashok Patil
Published:

Check Mobile Network Tips:- आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र कितीही चांगला प्रोसेसर किंवा जास्त रॅम असलेला फोन असला तरी जर नेटवर्क कनेक्टिव्हिटी चांगली नसेल तर त्याचा उपयोग कमीच ठरतो.

नेटवर्क कमकुवत असल्यास कॉल ड्रॉप होणे, इंटरनेट स्पीड मंदावणे आणि कनेक्शन सतत खंडित होणे यासारख्या समस्या उद्भवतात. अनेकदा सिग्नल बार फुल दिसतो पण तरीही इंटरनेटचा वेग समाधानकारक नसतो. अशा वेळी तुमच्या भागात कोणत्या नेटवर्कची सेवा उत्तम आहे, हे शोधून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

नेटवर्क स्ट्रेंथ कशी तपासाल?

नेटवर्क तपासण्यासाठी Opensignal नावाचे अ‍ॅप उपयुक्त ठरू शकते. हे अ‍ॅप वापरून तुम्ही तुमच्या परिसरातील Jio, Airtel, Vi किंवा BSNL यापैकी कोणत्या ऑपरेटरची सेवा सर्वोत्तम आहे हे तुम्ही समजू शकता. नवीन सिम खरेदी करण्यापूर्वी किंवा एखाद्या नेटवर्कवर पोर्ट करण्यापूर्वी तुमच्या भागातील नेटवर्कची गुणवत्ता तपासण्यासाठी हे अ‍ॅप वापरणे फायद्याचे ठरेल.

Opensignal अ‍ॅपचा वापर कसा करावा?

तुमच्या भागातील नेटवर्क स्ट्रेंथ आणि कव्हरेज जाणून घेण्यासाठी प्रथम Google Play Store किंवा Apple App Store वरून Opensignal अ‍ॅप डाऊनलोड करा. अ‍ॅप इंस्टॉल झाल्यावर तुम्हाला त्यामध्ये प्राथमिक सेटअप पूर्ण करावा लागेल. अ‍ॅपचे मुख्य पृष्ठ उघडल्यावर तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील.त्यामध्ये Coverage हा पर्याय निवडावा.

या पर्यायामध्ये तुम्हाला तुमच्या परिसरातील सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सच्या नेटवर्क स्ट्रेंथचा तुलनात्मक अभ्यास करता येईल. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही नकाशाच्या स्वरूपात Jio, Airtel, Vi आणि BSNL यांचे कव्हरेज आणि सिग्नल कॉलिटी पाहू शकता. त्यामुळे कोणते नेटवर्क तुमच्या भागात सर्वोत्तम कार्य करते हे स्पष्ट होईल आणि तुम्ही योग्य नेटवर्क निवडू शकाल.

Opensignal अ‍ॅपचे महत्त्वाचे फायदे

हे अ‍ॅप केवळ नेटवर्क कव्हरेजच दाखवत नाही तर मोबाईल डेटा आणि Wi-Fi स्पीड तपासण्याचेही साधन पुरवते. यामध्ये एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे तुमचा फोन कोणत्या नेटवर्क टॉवरशी जोडलेला आहे हे तपासण्याची सुविधा असल्याने यामुळे तुम्ही ज्या नेटवर्कवर आहात त्याच्या सिग्नलच्या गुणवत्तेचा अचूक अंदाज येतो.

तसेच या अ‍ॅपमध्ये एक इंटरअ‍ॅक्टिव्ह मॅप उपलब्ध आहे. जो तुम्हाला वेगवेगळ्या ऑपरेटरच्या कव्हरेज आणि सिग्नल स्ट्रेंथची थेट तुलना करून दाखवतो. जर तुम्हाला नवीन सिम खरेदी करायचे असेल किंवा दुसऱ्या नेटवर्कवर पोर्ट करायचे असेल तर या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही तुमच्या भागातील सर्वोत्तम कनेक्टिव्हिटी आणि स्पीड असलेला ऑपरेटर सहज निवडू शकता.

नवीन सिम घेण्यापूर्वी नेटवर्क टेस्ट

बऱ्याच वेळा नवीन सिम खरेदी करताना आपण जाहिरातींवर किंवा इतरांच्या अनुभवांवर अवलंबून निर्णय घेतो. मात्र हे नेहमीच योग्य ठरत नाही. प्रत्येक भागातील नेटवर्कची परिस्थिती वेगळी असते.

त्यामुळे तुमच्या परिसरात उत्तम सेवा देणाऱ्या ऑपरेटरची माहिती घेणे आवश्यक आहे. Opensignal अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही कोणतेही सिम कार्ड घेण्यापूर्वी नेटवर्कची स्थिती जाणून घेऊ शकता आणि भविष्यातील नेटवर्क समस्या टाळू शकता.

यामुळे जर तुम्ही नवीन सिम घेण्याचा विचार करत असाल किंवा सतत नेटवर्कच्या समस्यांमुळे त्रस्त असाल, तर Opensignal अ‍ॅप तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. काही सेकंदात तुमच्या परिसरातील सर्व नेटवर्क्सची तुलना करा आणि सर्वोत्कृष्ट नेटवर्क निवडून झिरो बफरिंगसह कॉल आणि इंटरनेटचा आनंद घ्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe