Chinese Apps पाच वर्षांनंतर पुन्हा भारतात ! TikTok चे काय झाले वाचा संपूर्ण अपडेट

Karuna Gaikwad
Published:

भारतातील सर्व मोबाईल युजर्ससाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे, २०२० मध्ये भारत सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव अनेक चिनी Apps वर बंदी घातली होती.गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर हा निर्णय घेतला गेला,ज्यामध्ये अनेक भारतीय सैनिक शहीद झाले.या निर्णयामुळे TikTok,PUBG Mobile, WeChat आणि UC Browser यांसारखे लोकप्रिय Apps भारतात बंद करण्यात आले.मात्र, आता काही चिनी Apps भारतात पुन्हा एकदा येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

भारत आणि चीनमधील राजकीय संबंध सुधारण्याच्या पार्श्वभूमीवर काही Apps वर लादलेली बंदी उठवली जात आहे. परंतु काही Apps थेट पूर्वीच्या नावाने परत आले असले तरी काहींनी आपली ओळख बदलली आहे. TikTok मात्र अद्यापही भारतात परतलेले नाही. त्यामुळे अनेक युजर्सच्या मनात याबाबत उत्सुकता आहे की, लोकप्रिय व्हिडिओ शेअरिंग TikTok App देखील पुन्हा भारतात येईल का ?

३६ चिनी Apps पुन्हा लिस्ट

इंडिया टुडेच्या बातमी नुसार २०० हून अधिक बंदी घातलेल्या Apps पैकी ३६ Apps प्ले स्टोअर आणि Apple Apps स्टोअरवर पुन्हा दिसू लागले आहेत. हे Apps वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये आहेत, जसे की गेमिंग, कंटेंट क्रिएशन, मनोरंजन, फाइल शेअरिंग आणि शॉपिंग. काही Apps त्याच नावाने उपलब्ध आहेत, तर काहींनी नवे नाव किंवा नवीन लोगो देखील बदलले आहेत.

ही Apps बहुतेक हळूहळू भारतीय बाजारात परतली आहेत. मात्र, सरकारने त्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. काही Apps नी भारतीय कायद्यांचे पालन करण्यासाठी मालकी बदलली आहे, तर काहींनी नवीन भागीदार शोधून पुन्हा प्रवेश केला आहे.

कोणते Apps परत आले ?

परत आलेल्या काही प्रमुख Apps मध्ये Xender (फाइल शेअरिंग), Youku (स्ट्रीमिंग), Taobao (शॉपिंग), आणि Tantan (डेटिंग) यांचा समावेश आहे.यातील काहींनी त्यांच्या नावांमध्ये किरकोळ बदल केले आहेत.उदाहरणार्थ, Xender आता ‘Xender: File Share, Share Music’ या नावाने Apps स्टोअरवर उपलब्ध आहे, मात्र अजूनही Google Play Store वर दिसत नाही.

Youku या स्ट्रीमिंग App ने आपले नाव बदलून पुनरागमन केले आहे, पण त्याचा मूळ स्वरूपात फारसा बदल झालेला नाही. Taobao हे App ‘Mobile Taobao’ या नावाने लिस्ट झाले आहे, तर Tantan आता ‘Tantan – Asian Dating App’ या नावाने उपलब्ध आहे.

काही Apps नी मालकी बदलली

काही चिनी Apps नी भारतीय कायद्यांचे पालन करण्यासाठी स्थानिक कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे.उदाहरणार्थ, बंदी घालण्यात आलेले Shein (फॅशन App) आता भारतात परतले आहे, परंतु त्याची मालकी Reliance Industries कडे आहे.वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी डिसेंबर २०२४ मध्ये स्पष्ट केले की Shein चा डेटा भारतातच संग्रहित केला जाईल आणि मूळ चिनी कंपनीला त्यावर कोणताही प्रवेश मिळणार नाही.

याचप्रकारे, PUBG Mobile देखील २०२१ मध्ये नवीन नावाने परतला. Krafton ने भारतीय कायद्यांचे पालन करून Battlegrounds Mobile India (BGMI) नावाने हा गेम पुन्हा लॉन्च केला.२०२२ मध्ये हा गेम पुन्हा बंद करण्यात आला,परंतु २०२३ मध्ये तो पुन्हा सुरू करण्यात आला.

टिकटॉक भारतात परतणार का ?

TikTok हे भारतात सर्वाधिक वापरले जाणारे चिनी App होते, परंतु २०२० मध्ये त्यावर बंदी घालण्यात आली. सध्या TikTok अजूनही भारतात उपलब्ध नाही, आणि सरकारने त्याच्या लॉन्च बद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही.

TikTok च्या मालकीच्या ByteDance कंपनीने भारतात परतण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले आहेत.असेही अहवाल समोर आले आहेत की कंपनी भारतीय भागीदार शोधत आहे, जेणेकरून भारत सरकारच्या नियमांचे पालन करून App पुन्हा लॉन्च करता येईल. मात्र, सध्या TikTok च्या लॉन्चची कोणतीच माहिती अद्याप समोर आलेली नाही.

बंदी घातलेल्या Apps चे क्लोन बाजारात

बंदी घालण्यात आले असले तरी, या Apps च्या क्लोन किंवा पुनरुत्थान केलेल्या आवृत्त्या भारतीय बाजारात दिसू लागल्या आहेत. TikTok ला पर्याय म्हणून Moj, Josh, आणि MX TakaTak यांसारखी भारतीय Apps मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आहेत.

चिनी Apps च्या पुनरागमनाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारच्या धोरणांवर आणि सुरक्षाविषयक धोरणांवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरणार आहे.भारत आणि चीनमधील संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांदरम्यान, हे Apps पुन्हा भारतात सक्रिय होत आहेत. मात्र, सरकारच्या पुढील निर्णयांवर याचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe