CrossBeats Groov Buds : सध्या भारतीय बाजारामध्ये वायरलेस बड्स वेगाने ट्रेंड होत आहेत. आता वायरलेस आणि ब्लूटूथ स्पीकर खूप सामान्य झाले आहे. अनेक स्मार्टफोन युजर्स हे बड्स वापरताना तुम्ही पाहिले असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या बड्सचा सर्वात जास्त वापर तरुणांकडून होत आहे.
आता तुम्ही देखील हे कूल डिव्हाइस खरेदी करू शकता. काही बड्सच्या किमती खूप जास्त असतात, त्यामुळे ते अनेकांना खरेदी करता येत नाही. अशातच आता जर तुम्ही नवीन बड्स घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
बाजारात CrossBeats Groov इअरबड्स लाँच झाले आहे. तुम्ही ते फक्त स्वत:साठीच नाही तर तुमच्या मित्रांना किंवा कुटंबियांना गिफ्ट देण्यासाठी हे परवडणारे आणि उत्तम इयरबड खरेदी करता येईल. कंपनीच्या नवीन इअरबड्सची किंमत 1499 रुपये आहे.
मिळतील शानदार फीचर्स
कंपनीचे हे इयरबड्स IPX5 रेटिंगसह येत असून जे ते पाणी/घाम प्रतिरोधक बनवतात. नवीन इयरबड्स ClearCommTM तंत्रज्ञानाने सुसज्ज असून या बड्सचे क्वाड मायक्रोफोन पर्यावरण आवाज रद्दीकरण (ENC) चे समर्थन करत आहेत. या इयरबडमध्ये इन-इअर डिझाइन तसेच हाय-रिस्पॉन्स सेन्सर इअरबड आणि क्वालकॉम aptX अडॅप्टिव्ह ऑडिओ सपोर्ट देण्यात आला आहे.
मिळेल यूएसबी टाइप सी पोर्ट
नवीन इअरबड्स Android आणि iOS दोन्ही उपकरणांवर काम करू शकेल. कंपनीने चार्जिंगसाठी, यामध्ये यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट दिले आहे. तर शक्तिशाली गेमिंग अनुभवासाठी, Groove Buds 40ms खूप कमी लेटन्सी गेमिंग मोड ऑफर करत आहे. हे इअरबड्स मल्टी-टच कंट्रोल – फेदर टचपॅडसह तुम्हाला खरेदी करता येईल.
जाणून घ्या नवीन इअरबड्सची किंमत आणि उपलब्धता
किमतीबद्दल बोलायचे झाले तर कंपनीच्या नवीन इअरबड्सची किंमत 1499 रुपये इतकी आहे. ग्राहकांना ते थेट Crossbeats वेबसाइटवरून किंवा Amazon, Flipkart, Myntra आणि Tata Cliq वरून खरेदी करता येईल. नव्याने लाँच झालेले ‘ग्रूव्ह बड्स’ ग्राहकांना काळ्या रंगामध्ये खरेदी करता येईल.