Cyber Alert : हॅकर्स अनेकवेळा वापरकर्त्यांच्या मोबाईल हॅक करून लाखो रुपयांची रक्कम लंपास करत आहेत. यामुळे त्यांना लाखो रुपयांचा फटका बसतो शिवाय त्यांची खासगी माहिती चोरीला जाते. सध्या हॅकर्सकडून सोशल मीडिया अॅप्सद्वारे त्यांची मोहीम चालवण्यात येत आहेत.
सध्या ते DogerAT म्हणजेच रिमोट ऍक्सेस ट्रोजनच्या माध्यमातून हल्ला करत आहेत. ते Netflix आणि Youtube यांसारख्या बनावट अॅप्सच्या मदतीने उद्योगांमधील उपकरणांना लक्ष्य करत आहे. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध असणे खूप गरजेचे आहे.

CloudSEK च्या TRIAD टीमकडून SMS स्टीलर घोटाळ्याच्या मोहिमेची चौकशी करत असताना DogerAT मालवेअर शोधण्यात आला आहे. या दरम्यान असे संशोधकांनी नोंदवले आहे की नवीन मालवेअर हे ओपन सोर्स मालवेअर असून ते बँकिंग, वित्तीय सेवा, ई-कॉमर्स, मनोरंजन आणि विमा उद्योगांशी जोडल्या असणाऱ्या इंटरनेट वापरकर्त्यांना लक्ष्य करत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याला बळी पडणारे अनेक वापरकर्ते भारतीय असले तरी हा जागतिक मालवेअर हल्ला आहे.
DogerAT मालवेअर
AI कंपनी CloudSEK कडून असे सांगण्यात आले आहे की DogerAT मालवेअर हा खरतर मोबाईल ऍप्लिकेशन किंवा गेमच्या वेषात डिव्हाइसेसपर्यंत पोहचून हॅकरला लक्ष्य डिव्हाइसवर नियंत्रण मिळते. हे मालवेअर मेसेजिंग अॅप्स टेलीग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे की गेम, उत्पादकता साधने किंवा अगदी YouTube-Netflix सारख्या मनोरंजन अॅप्सद्वारे पसरवण्यात येत आहे. थर्ड-पार्टी अॅप इन्स्टॉलेशन हे त्याच्या पसरण्याचे कारण असू शकते.
बँक खाते हॅक
संबंधित डिव्हाइसपर्यंत पोहोचल्यानंतर हा मालवेअर पीडित व्यक्तीची सर्व वैयक्तिक माहिती चोरतो, यात त्याचे संपर्क, संदेश आणि बँकिंग लॉगिन तपशील यांचा समावेश असतो. तसेच मालवेअर आक्रमणकर्त्याला डिव्हाइसचे संपूर्ण नियंत्रण देऊन त्यानंतर तो फोनवरील क्रियाकलाप सहजपणे स्वतःच्या नुसार करतो आणि बँकिंग अॅप्सद्वारे खात्यात डेंट करतो. इतकेच नाही तर आता हल्लेखोर फोनचा कॅमेरा आणि मायक्रोफोनद्वारेही हेरगिरी करू शकतो.
असे ठेवा स्वतःला सुरक्षित
तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला सुरक्षित ठेवू शकता. त्यासाठी, तुम्ही विश्वासार्ह स्त्रोतांकडूनच नवीन अॅप्स इंस्टॉल करावे. सतत तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर अपडेट करा, तसेच कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करण्याची किंवा अटॅचमेंट डाउनलोड करू नका. हल्लेखोर आमिषापासून धमकावण्यापर्यंतचे डावपेच वापरत असतात त्यामुळे स्वत:ला जागरूक ठेवा. इतकेच नाही तर तुम्हाला मालवेअर शोधण्याच्या साधनांचीही मदत घेता येते.