फोन स्क्रीनवर हिरवी रेषा दिसतेय?, घाबरून जाऊ नका; ‘या’ ट्रिक्सने सेकंदात प्रॉब्लेम होईल SOLVE

स्मार्टफोनच्या स्क्रीनवर हिरव्या रेषा दिसत असल्यास घाबरून जाऊ नका. काही सोप्या पद्धती आणि ट्रिक्स वापरून तुम्ही घरीच ही समस्या सोडवू शकता आणि स्क्रीन दुरुस्त करू शकता.

Published on -

Green Line on Smartphone Screen | स्मार्टफोन वापरणाऱ्या अनेकांना स्क्रीनवर अचानक हिरव्या रेषा दिसण्याचा अनुभव आलेला असतो. ही समस्या कधी सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे तर कधी हार्डवेअरमधील बिघाडामुळे उद्भवते. अनेक वेळा ही समस्या गंभीर वाटत असली तरी काही सोप्या उपायांनी ती घरच्या घरीच दुरुस्त होऊ शकते. जर तुमच्या फोनच्या स्क्रीनवरही हिरवी रेषा दिसत असेल, तर खाली दिलेले उपाय नक्कीच उपयुक्त ठरू शकतात.

सर्वप्रथम, हिरव्या रेषा दिसण्यामागची संभाव्य कारणं समजून घेणे आवश्यक आहे. फोन खूप गरम झाल्यामुळे, व्होल्टेजमध्ये बदल झाल्यास, AMOLED किंवा OLED स्क्रीनमध्ये बिघाड आल्यास, डिस्प्ले कनेक्टर सैल झाल्यास, फोन पाण्यात पडल्यास किंवा स्क्रीन सर्किटमध्ये दोष आल्यास स्क्रीनवर हिरव्या रेषा दिसू शकतात. याशिवाय, काही वेळा नवीन सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतर UI संबंधित समस्या उद्भवतात. थर्ड-पार्टी अ‍ॅप्स किंवा कस्टम थीम्समुळेही स्क्रीनवर ग्राफिक बिघाड होतो आणि अशावेळी हिरव्या रेषा उमटू शकतात.

‘या’ स्टेप्स फॉलो करा-

जर ही समस्या सॉफ्टवेअरशी संबंधित असेल, तर काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही ती घरीच दुरुस्त करू शकता. सर्वात आधी, फोन रीस्टार्ट करून पहा – अनेक वेळा हा एक उपायच पुरेसा ठरतो. जर रेषा अजूनही दिसत असेल, तर ‘सेफ मोड’मध्ये फोन सुरू करा. सेफ मोडमध्ये चालवताना फक्त आवश्यक अ‍ॅप्स सुरू होतात आणि त्यामुळे त्रुटी निर्माण करणारे अ‍ॅप्स बंद राहतात. यामुळे तुम्हाला समस्या सॉफ्टवेअरमुळे आहे की नाही हे समजण्यास मदत होते.

त्यानंतर, सिस्टिम सॉफ्टवेअर अपडेट तपासा. बऱ्याच कंपन्या या समस्यांसाठी सॉफ्टवेअर अपडेटद्वारे उपाय जारी करतात. सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतर समस्या कायमची दूर होऊ शकते. शेवटचा पर्याय म्हणजे – फॅक्टरी रीसेट. या प्रक्रियेमध्ये फोनचा संपूर्ण डेटा डिलीट होतो, म्हणून आधी संपूर्ण बॅकअप घ्या आणि मगच फॅक्टरी रीसेट करा.

जर वरील सगळ्या उपायांनी देखील हिरव्या रेषा हटत नसतील, तर ही हार्डवेअरशी संबंधित समस्या असू शकते. अशावेळी तांत्रिक सेवा केंद्रात जाऊन तपासणी करून घ्या. काही कंपन्या, जसं की सॅमसंग आणि वनप्लस, अशा परिस्थितीत ग्राहकांना मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट सुविधा देतात. त्यामुळे गॅरंटी किंवा वॉरंटीमध्ये मोफत सेवा मिळू शकते.

एकूणच, हिरव्या रेषा दिसल्यावर घाबरण्याचं काही कारण नाही. सुरुवातीला घरच्या घरी काही उपाय करून पहा, आणि जर ते उपयोगी ठरत नसतील, तर अधिकृत सेवा केंद्रात जाऊन योग्य दुरुस्ती करून घ्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News