Samsung Galaxy : संधी चुकवू नका! सॅमसंगने स्वस्त केला आपला जबरदस्त स्मार्टफोन, बघा…

Ahmednagarlive24 office
Published:
Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंग चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या सॅमसंगचा एक फोन मोठ्या डिस्कॉऊंटसह मिळत आहे. सॅमसंगने हा फोन गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लॉन्च केला होता, या फोनचे नाव Galaxy A15 असे आहे.

या मिड रेंज स्मार्टफोनच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. हा फोन दोन प्रकारात येतो. फोनच्या दोन्ही व्हेरियंटची किंमत कमी करण्यात आली आहे. हा 5G सक्षम स्मार्टफोन MediaTek प्रोसेसरसह येतो आणि 25W जलद चार्जिंगला सपोर्ट करतो.

Samsung ने Galaxy A15 8GB 128GB आणि 8GB 256GB च्या दोन प्रकारांमध्ये लॉन्च केला. त्यांची किंमत अनुक्रमे 19,499 आणि 22,499 रुपये ठेवण्यात आली होती. आता 1,500 रुपयांच्या कपातीनंतर, 128GB व्हेरिएंट 17,999 रुपयांना खरेदी करता येईल आणि 3,000 रुपयांच्या कपातीनंतर 256GB व्हेरिएंट 19,499 रुपयांना खरेदी करता येईल.

या स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह octa-core MediaTek Dimensity 6100 प्रोसेसर आहे. मेमरी कार्डच्या मदतीने फोनचे स्टोरेजही वाढवता येते. यात 800 nits पीक ब्राइटनेस आणि 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा FHD डिस्प्ले आहे.

फोटोग्राफीच्या बाबतीत, फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरासह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात 5MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देखील समाविष्ट आहे. सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 13MP कॅमेरा आहे. Galaxy A15 5G ची बॅटरी 5000mAh आहे आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील येथे दिला गेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe