Xiaomi QLED TV : शाओमी भारतीय बाजारात पुन्हा एकदा नवा ट्रेंड सेट करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने त्यांच्या आगामी Xiaomi QLED TV X Pro सिरीजच्या लाँचची घोषणा केली असून, हे स्मार्ट टीव्ही 10 एप्रिल 2025 रोजी लाँच करण्यात येणार आहेत. या नवीन टीव्ही सिरीजमध्ये प्रीमियम व्हिज्युअल आणि ऑडिओ अनुभव देणाऱ्या फीचर्सचा समावेश आहे. ग्राहकांना घरबसल्या थिएटरसारखा अनुभव मिळावा, असा या टीव्ही डिझाइनचा उद्देश आहे.
गेमिंगसाठी खास-
शाओमीने त्यांचे अधिकृत X (Twitter) हँडलवरून टीझर शेअर करताना सांगितले आहे की, नवीन टीव्ही सिरीज फ्रेमलेस डिझाइनसह येणार आहे. यामध्ये 4K रिझोल्यूशन डिस्प्ले, जास्त कॉन्ट्रास्ट, रिच कलर्स आणि स्पष्ट ऑडिओ अनुभव घेता येणार आहे. ‘CineMagiQLED’ या टॅगलाइनसह शाओमी प्रेक्षकांना अधिक इमर्सिव्ह आणि सिनेमॅटिक अनुभव देणार असल्याचा दावा करत आहे.

या टीव्ही सिरीजमध्ये गेमिंग मोड देखील दिला जाणार आहे, ज्यामुळे गेमिंग करताना लेटंसी खूपच कमी राहणार आहे. गेम कन्सोलशी कनेक्ट करून सहज आणि लॅग-फ्री गेमिंगचा अनुभव घेता येईल. ही सिरीज शाओमीच्या स्मार्ट होम इकोसिस्टमशी सहज जोडता येईल, म्हणजेच घरातील इतर स्मार्ट डिव्हाइसेसही एका ठिकाणावरून नियंत्रित करता येणार आहेत.
व्हॉइस असिस्टंट सपोर्ट मिळणार-
या टीव्हीमध्ये व्हॉइस असिस्टंट सपोर्टही असेल, त्यामुळे रिमोटशिवाय आवाजाच्या आधारेही कंट्रोल शक्य होणार आहे. तसेच यामध्ये वैयक्तिक कंटेंट शिफारशीचा पर्याय दिला जाणार आहे, म्हणजे प्रत्येक वापरकर्त्याला त्यांच्या पसंतीनुसार कंटेंट सुचवला जाईल. या सिरीजमध्ये वेगवेगळ्या स्क्रीन साइज आणि फिचर्ससह अनेक मॉडेल्स असण्याची शक्यता आहे.
शाओमीचा स्मार्ट टीव्ही विभाग आधीपासूनच भारतीय बाजारात लोकप्रिय आहे. परवडणाऱ्या किंमती, दर्जेदार हार्डवेअर आणि सुलभ इंटरफेसमुळे कंपनीने ग्राहकांचा विश्वास मिळवला आहे. ही नवीन सिरीज त्यात अधिक भर घालेल आणि प्रेक्षकांना घरबसल्या थिएटरसारखा अनुभव मिळवून देईल.