मोबाईलचा अतिवापर ठरू शकतो घातक, WHO ने दिला धोक्याचा इशारा; आत्ताच व्हा सावध!

मोबाईलचा अतिजास्त वापार हे सध्या एक व्यसनच बनले आहे. लहानपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला मोबाईलवर अधिक वेळ घालण्याची सवय लागली आहे. मात्र, मोबाईलचा सातत्यपूर्ण वापर तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम करू शकतो. यामुळे बहिरेपणसोबत इतरही समस्या निर्माण होऊ शकतात.

Published on -

Mobile Phones | मोबाइल फोन हे आजच्या काळात एक अनिवार्य उपकरण बनले आहे. संवाद, मनोरंजन, सोशल मीडिया आणि कामकाजासाठी आपण सतत फोन वापरत असतो. पण या वापरामध्ये काही सवयी अशा असतात ज्या आपल्या आरोग्यासाठी, विशेषतः ऐकण्याच्या क्षमतेसाठी हानिकारक ठरतात. सतत फोनवर बोलणे, मोठ्या आवाजात गाणी ऐकणे आणि तासन्‌तास इअरफोन्स किंवा हेडफोन्स लावून ठेवणे ही अशीच एक धोकादायक सवय आहे.

अतिवापर घातक-

अनेकदा आपण लक्ष देत नाही, पण मोबाइलचा अति वापर आपली ऐकण्याची क्षमता हळूहळू कमी करू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार 12 ते 35 वर्षे वयोगटातील सुमारे 1,000 कोटी लोकांना ऐकू न येण्याचा धोका आहे आणि यामागचं प्रमुख कारण म्हणजे मोबाईलमधून निघणारे उच्च आवाज आणि रेडिएशन. सतत फोनवर बोलणे आणि कानाजवळ ठेवलेला फोन हे दोन्ही आपल्या कानातील नाजूक पेशींवर परिणाम करत असतात.

मोबाइलमधून निघणारं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मेंदू आणि कानाच्या आतील भागावर हानीकारक परिणाम करू शकतं. यामुळे ऐकण्याची क्षमता कमी होणे, कानात सतत आवाज येणे, जळजळ होणे किंवा वेदना वाटणे अशी लक्षणं दिसून येऊ शकतात. ही लक्षणं वेळेवर ओळखून ताबडतोब ईएनटी तज्ज्ञांकडे जाणं गरजेचं आहे.

काय उपाय कराल?

या समस्येपासून बचाव करण्यासाठी काही उपाय करणे महत्त्वाचे आहे. फोनवर बोलताना शक्य असल्यास स्पीकर मोड किंवा एअरट्यूब हेडसेट वापरावं. इअरफोन किंवा हेडफोनचा वापर 60 मिनिटांपेक्षा अधिक करू नये आणि आवाजाची पातळी 60% पेक्षा कमी ठेवावी. रात्री झोपताना फोन उशाजवळ ठेवू नये किंवा कानात लावून गाणी ऐकू नयेत. दर 30-40 मिनिटांनी ब्रेक घेतल्यास कानांना विश्रांती मिळते.

आपल्या दैनंदिन सवयी थोड्याशा बदलल्यास आपण दीर्घकाळासाठी आपल्या ऐकण्याच्या क्षमतेला सुरक्षित ठेवू शकतो. त्यामुळे आता तरी सावध व्हा आणि आपल्या कानांची काळजी घ्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe