Fire Boltt Visionary Ultra : जर तुम्ही नवीन स्मार्टवॉच खरेदी करणार असाल तर जरा इकडं लक्ष द्या. कारण फायर-बोल्टची दोन स्मार्टवॉच लाँच झाली आहेत. ज्याची विक्री पुढच्या आठवड्यात 15 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. जी तुम्ही कंपनीची वेबसाइट आणि अॅमेझॉनवरून सहज खरेदी करू शकता.
कंपनीने आपले फायर बोल्ट व्हिजनरी अल्ट्रा आणि व्हिजनरी प्रो स्मार्टवॉच लाँच केले आहे. ज्याची किंमत तुमच्या बजेटमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही ते सहज खरेदी करू शकता. या दोन्ही स्मार्टवॉचमध्ये कंपनीने 5 दिवसांची बॅटरी लाइफ आणि जबरदस्त फीचर्स दिली आहेत.
जाणून घ्या वैशिष्ट्ये
फायर बोल्ट व्हिजनरी अल्ट्रा आणि व्हिजनरी प्रो स्मार्टवॉच 1.78-इंच नेहमी-ऑन AMOLED स्क्रीनसह तुम्हाला खरेदी करता येईल. हे स्मार्टवॉच नेहमी-ऑन डिस्प्लेसह देते. व्हिजनरी अल्ट्रामध्ये मजबूत धातूचा पट्टा आणि व्हिजनरी प्रोमध्ये चुंबकीय चामड्याचा पट्टा मिळेल.
तुम्ही आता ब्लूटूथ वापरून कॉल देखील करू शकता, त्यामुळे तुमचा कॉल इतिहास पाहू शकता. तसेच तुमचे संपर्क सिंक करता येतील. यामध्ये कॉलिंगसाठी स्मार्टवॉचमध्ये माइक आणि स्पीकर दिले आहेत. स्मार्टवॉचमध्ये 110 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड दिले आहेत. व्हॉइस असिस्टंटशी बोलू शकता. यात झोप, हृदय गती, रक्त-ऑक्सिजन आणि कालावधी यांचा मागोवा घेण्यासाठी हेल्थ सेन्सर दिला आहे. जे तुमच्या आरोग्यावर बारीक लक्ष ठेवतात.
बॅटरी लाइफ
हे स्मार्टवॉच पाणी आणि धूळ प्रतिरोधक असल्याने तुम्ही ते बिनधास्त वापरू शकता. हे इअरबड्सशी वायरलेस पद्धतीने कनेक्ट होते. यामध्ये टॉर्च, नोटिफिकेशन आणि वेदर अपडेट सारखे फीचर्स मिळेल. तुम्ही तुमच्या फोनचा कॅमेरा आणि संगीत स्मार्टवॉचमधून नियंत्रित करता येईल. तुम्ही स्मार्टवॉच टायमर, अलार्म किंवा स्टॉपवॉच म्हणून वापरता येईल. या स्मार्टवॉचची बॅटरी 5 दिवस चालते, असा कंपनीने दावा केला आहे.
जाणून घ्या किंमत
किमतीचा विचार केला तर फायर-बोल्ट व्हिजनरी अल्ट्रा 3,499 रुपयांच्या विशेष प्रास्ताविक किमतीत लॉन्च करण्यात आले आहे. ते सोनेरी, काळ्या आणि चांदीच्या रंगांत खरेदी करता येईल. तर दुसरीकडे, ग्रे, ब्लॅक, ब्लू आणि ऑरेंज रंगांमध्ये उपलब्ध असलेले व्हिजनरी प्रो मॉडेल देखील तुम्हाला एकाच किंमतीत खरेदी करता येईल. ही दोन्ही स्मार्टवॉच 15 ऑगस्टपासून कंपनीच्या वेबसाइट आणि अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होतील.