Foldable Smartphone Price Drop : नवीन प्रीमियम हँडसेट खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. ज्यांना प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करायचा असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये प्रीमियम हँडसेटची मागणी वाढली आहे.
टेक्नो कंपनीचा Phantom V Fold 2 सुद्धा असाच दमदार ऑप्शन बनला आहे. खरेतर फेस्टिवल सिझन सुरू असल्याने अमेझॉन व फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाइन शॉपिंग साइटवर सेल सुरू आहे.

अमेझॉनवरील ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट सुद्धा दिला जातो. ट्रेंडी फोल्डेबल फोन Tecno Phantom V Fold 2 वर सुद्धा तुम्हाला आता मोठा डिस्काउंट मिळणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी अमेझॉनवर सेल सुरू असतो.
यंदा पण Amazon Great Indian Festival सेल सुरु आहे. येथे तुम्हाला फँटम V फोल्ड 2 वर मोठी सवलत मिळत आहे. कंपनीने 12 जीबी रॅम + 512 जीबी इंटरनल स्टोरेज असणारे हे मॉडेल 89,999 रुपयांना उपलब्ध करून दिले आहे.
पण अमेझॉनवरील ऑफरमध्ये ग्राहकांना थेट 20 हजार रुपयांचा कूपन डिस्काउंट मिळेल. तसेच अतिरिक्त 10 टक्के इन्स्टंट बँक डिस्काउंट पण मिळणार आहे. सोबत ग्राहकांना 4,499 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळणार आहे. याशिवाय येथे तुमच्यासाठी एक्सचेंज ऑफर देखील सुरू आहे.
म्हणजे तुम्ही तुमच्याकडील जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून अतिरिक्त बचत करू शकता. पण एक्सचेंज ऑफर अंतर्गत मिळणारा एक्सचेंज बोनस हा तुमच्या जुन्या फोनच्या मॉडेलवर आणि त्याच्या कंडिशनवर अवलंबून असेल.
येथे ग्राहकांना 52,600 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळवण्याची संधी आहे. नक्कीच ज्यांना नवीन प्रीमियम हँडसेट घ्यायचा असेल त्यांच्यासाठी अमेझॉन वर सुरू असणारा सेल फायदेशीर ठरणार आहे.