जबरदस्त ऑफर!!! वनप्लसच्या ‘या’ स्मार्टफोन खरेदीवर 27,999 रुपयांचे घड्याळ मोफत

Ahmednagarlive24 office
Published:
OnePlus Open

OnePlus : जर तुम्ही सध्या वनप्लसचा फोल्डेबल फोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्याकडे एक उत्तम संधी आहे, कपंनी सध्या भारतीय बाजारपेठेतील निवडक फोन्सवर जबरदस्त ऑफर देत आहे, या ऑफरअंतर्गत OnePlus Open खरेदीवर तब्बल 5000 पर्यंत सूट दिली जात आहे. तसेच 27,999 रुपये किमतीचे OnePlus Watch 2 देखील मोफत दिले जात आहे.

भारतीय बाजारात, 16GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह OnePlus Open चे एकमेव वेरिएंट कंपनीच्या वेबसाइटवर आणि ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर 139,999 रुपयांना लिस्ट केले गेले आहे. या फोनवर तुम्हाला इतर काही ऑफर्सचाही लाभ मिळत आहे, ते पुढीलप्रमाणे :-

या फोनवर ग्राहकांना 5000 रुपयांची झटपट सूट ICICI नेटबँकिंग, HDFC क्रेडिट कार्ड EMI, HDFC डेबिट कार्ड EMI, OneCard EMIs आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर मिळेल. तसेच तुम्हाला 12 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI निवडक बँकांसह उपलब्ध असेल.

काय आहे ऑफर?

हा फोन ग्राहकांनी 30 जूनपूर्वी ऑर्डर केला तर या फोनवर OnePlus Watch 2 मिळेल, याशिवाय OnePlus स्टुडंट प्रोग्रामवर 5000 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. JioPlus च्या 699 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये 15000 रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत. एवढेच नाही तर, रेड केबल क्लबमध्ये सामील झाल्यावर 9,999 रुपये किमतीचे कूपन, 6 महिन्यांचे 100GB Google One क्लाउड स्टोरेज आणि 3 महिन्यांपर्यंतचे YouTube Premium देखील मोफत दिले जात आहेत.

वैशिष्ट्य

OnePlus Open मध्ये दोन AMOLED डिस्प्ले, एक 7.6-इंच फोल्डेबल आणि 6.7-इंच कव्हर आहे, जे 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10 ला सपोर्ट करते. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरवर काम करतो. यात 48MP क्वाड-रियर कॅमेरा सिस्टम आणि 32MP सेल्फी कॅमेरा आहे. OnePlus Open मध्ये 4805mAh बॅटरी आहे, जी 67W सुपर फास्ट चार्जिंग सपोर्ट देते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe