Samsung Galaxy : मदर्स डेला आपल्या आईला गिफ्ट करा ‘हा’ जबरदस्त फोन, ॲमेझॉनवर मिळत आहे खूपच स्वस्त…

Ahmednagarlive24 office
Published:
Samsung Galaxy M15 5G

Samsung Galaxy : उद्या सर्वत्र मदर्स डे साजरा केला जाणार आहे. या खास दिवशी जर तुम्ही तुमच्या आईला मोबाईल गिफ्ट करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम स्कीम घेऊन आलो आहोत.

नुकताच शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर सेल सुरु झाला आहे. या सेल अंतर्गत ग्राहकांना कमी किंमतीत फोन मिळत आहेत. Amazon वर नुकताच लॉन्च झालेला Samsung Galaxy M15 5G एकदम स्वस्त किंमतीत, लिस्ट करण्यात आला आहे.

यामध्ये तुम्हाला एक मोठी बॅटरी आणि चांगला कॅमेरा देखील मिळत आहे. जर तुम्हाला तुम्हाला हा फोन घ्यायचा असेल, तर त्याच्या ऑफरबद्दल आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल जाणून घेऊया…

डिस्प्ले

या डिव्हाइसमध्ये 6.5 इंच फुल-एचडी सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. जे 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह वॉटरड्रॉप-स्टाईल नॉचने सुसज्ज आहे.

प्रोसेसर

मल्टीटास्किंगसाठी या डिव्हाइसमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंशन 6100 चिपसेट आहे. जो 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह येतो.

कॅमेरा

आजच्या काळात प्रत्येकाला कॅमेरा सर्वात जास्त आवडतो. ज्याचा प्राथमिक कॅमेरा 50 मेगापिक्सल्सचा आहे. जर तुम्हाला सेल्फी घेण्याचा शौक असेल तर तुम्हाला यात 13 मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल.

बॅटरी

फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. जी 6,000mAh च्या पॉवरफुल बॅटरीसह येते.

ऑफर

या फोनच्या किंमत आणि ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा सॅमसंग स्मार्टफोन तीन स्टोरेज प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. त्यापैकी पहिला 4GB RAM/128GB, 6GB RAM/128GB आणि 8GB RAM/128GB मध्ये येतो. या फोनची सुरुवातीची किंमत 11,999 रुपये आहे. तर त्याचा टॉप व्हेरिएंट 14,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे.

हा फोन खरेदी केल्यावर तुम्हाला 700 रुपयांचे डिस्काउंट कूपन मिळेल. याशिवाय त्यावर 1,500 रुपयांची बँक सूट मिळणार आहे. मात्र, ही सूट फक्त टॉप व्हेरियंटवरच मिळणार आहे. इतकंच नाही तर 582 रुपयांच्या सुरुवातीच्या EMI पर्यायावर तुम्ही ते खरेदी करून घरी आणू शकता. याशिवाय तुम्ही ब्लू टोपाज, सेलेस्टिया ब्लू आणि स्टोन ग्रे कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe