Mobile Recharge Plans : एअरटेलच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! ‘हा’ प्लान 56 दिवसांऐवजी चालेल 70 दिवस

Content Team
Published:
Mobile Recharge Plans

Mobile Recharge Plans : तुम्ही देखील एरटेल वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी आनंदाची आहे. भारती एअरटेलने आता त्यांच्या 395 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 70 दिवसांपर्यंत वाढवली आहे. होय ग्राहकांना आता तेवढ्याच पैशात जास्त दिवस मुदत दिली जाणार आहे.

पूर्वी कंपनीने हा प्लान 56 दिवसांच्या वैधतेसह लॉन्च केला होता. आता याची मुदत वाढवण्यात आली आहे. तथापि, योजनेचे उर्वरित फायदे पूर्वीसारखेच राहतील. कंपनीचा हा प्लॅन इतर कपंन्यांच्या प्लॅनपेक्षा महाग असल्यामुळे ग्राहक या प्लॅनकडे दुर्लक्ष करत होते. म्हणूनच कपंनीने या प्लॅनची मुदत वाढवली आहे.

एअरटेलची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी रिलायन्स जिओने देखील त्यांचा 395 रुपयांचा प्लान देखील ऑफर केला आहे. पण, यामध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित 5G डेटा दिला जातो. म्हणूनच आता एरटेलने देखील याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, एअरटेलच्या 395 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 600SMS आणि 6GB डेटा ऑफर करण्यात आला आहे. पण, यामध्ये अमर्यादित 5G डेटा दिलेला नाही. आता कंपनीने प्लॅनची ​​वैधता 56 दिवसांवरून 70 दिवसांपर्यंत वाढवली आहे. म्हणजेच ग्राहकांना आता या प्लॅनमध्ये दोन आठवड्यांची अधिक वैधता मिळणार आहे. तर, किंमत पूर्वीसारखीच राहील. अशा परिस्थितीत आता हा प्लॅन ग्राहकांसाठी स्वस्त झाला आहे.

पण, दुसरीकडे, जर आपण Jio च्या प्लानबद्दल बोललो तर कंपनीचा 395 रुपयांचा प्लान अजून एक पाऊल पुढे आहे. कारण, एअरटेलच्या तुलनेत हे 14 दिवसांची अधिक वैधता ऑफर करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की Airtel च्या प्लॅनमध्ये Airtel Thanks Benefits, Apollo 24|7 Circle, मोफत Hellotunes आणि Wynk Music वर मोफत प्रवेश यासारखे काही फायदे दिले आहेत.

395 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर हा एक प्रकारे व्हॅल्यू प्लान आहे. हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना डेटापेक्षा कॉलिंग सेवा आवश्यक आहे. कारण, त्यात काही डेटा देखील उपलब्ध आहे जो आपत्कालीन परिस्थितीत वापरकर्त्यांना उपयुक्त ठरू शकतो. याव्यतिरिक्त, ग्राहकांना आपत्कालीन परिस्थितीत अधिक डेटाची आवश्यकता असल्यास ते डेटा व्हाउचर देखील खरेदी करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe