OnePlus India : वनप्लस प्रेमींसाठी आनंदाची बातमी! पुढील महिन्यात लॉन्च होत आहे ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन…

Ahmednagarlive24 office
Published:
OnePlus India

OnePlus India : वनप्लस कंपनी गेल्या काही काळापासून एका मागून एक फोन लॉन्च करताना दिसत आहे, अशातच कंपनी आणखी एक फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, गेल्या वर्षी कंपनीने Nord CE 3 लॉन्च केला होता आता कंपनी OnePlus Nord CE 4 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी एप्रिल महिन्यात हा फोन लॉन्च करणार असल्याचे बोलले जात आहे.

कंपनीने फोनबाबतचा टीझरही जारी केला आहे. यासाठी एक मायक्रोसाइट देखील Amazon वर लाइव्ह झाली आहे. यात कंपनीने फोनबद्दल अनेक अपडेट दिले आहेत. ज्यामध्ये महत्त्वाचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

OnePlus Nord CE4 पुढील महिन्यात भारतात लॉन्च होईल. त्याचा लॉन्च इव्हेंट 1 एप्रिल रोजी संध्याकाळी 6.30 वाजता निश्चित करण्यात आला आहे. कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अधिकृतपणे फोनबाबत माहिती दिली आहे.

कपंनीच्या नवीन टीझरमध्ये, OnePlus Nord CE4 स्मार्टफोनची RAM-स्टोरेज क्षमता उघड झाली आहे. OnePlus Nord CE4 मध्ये 8GB RAM असेल ज्याचा प्रकार LPDDR4x असल्याचे म्हटले जात आहे. यासोबतच फोनमध्ये 8 GB व्हर्चुअल रॅमचा सपोर्टही असेल. म्हणजेच यात 16 GB RAM चा पॉवर दिसेल. फोनमध्ये 256GB स्टोरेज असल्याचे सांगितले जाते, ज्याचा प्रकार UFS 3.1 असेल.

कंपनीने येथे एक्सपांडेबल स्टोरेजचा पर्याय दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनचे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. प्रोसेसिंग बद्दल बोलायचे झाले तर ह्या फोन मध्ये Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर असणार आहे ज्याची कंपनी ने पुष्टी केली आहे. तसेच हा फोन दोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे.

कंपनी ने Nord CE4 बद्दल बरेच काही उघड केले आहे, परंतु कॅमेरा, बॅटरी, डिस्प्ले सारख्या काही विशिष्ट वैशिष्ट्यांबद्दल माहिती दिलेली नाही. लीक आणि रिपोर्ट्समध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, यामध्ये AMOLED पॅनल दिसू शकतो. फोनचा प्राथमिक कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असेल आणि 8 मेगापिक्सलचा वाईड अँगल लेन्स दिसू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe