स्मार्टफोन आपल्या रोजच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भागच होऊन बसलाय. पण कधी तरी या डिव्हाईसला काही बिघाड झालाच, तर त्यासाठी सर्व्हिस सेंटरच्या चकरा मारणं म्हणजे एक मोठी समस्या ! विशेषत: ऑफिस, घरकाम आणि दैनंदिन धावपळीच्या जगात वेळ काढणं खरंच अवघड होऊन बसतं. पण आता OnePlus ने याच समस्येचं अतिशय सोपं आणि ग्राहकप्रिय उत्तर दिलंय घरपोच दुरुस्ती सेवा!
OnePlus युजर्ससाठी ही खरंच आनंदाची बातमी आहे जे ऍपल आणि सॅमसंगसारखे दिग्गज ब्रँड आजवर करू शकले नाहीत, ते OnePlus ने करून दाखवलंय! आता फोन दुरुस्तीसाठी सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्याची गरजच नाही, कारण OnePlus तंत्रज्ञ थेट तुमच्या घरपोच येणार आहे.

डोअरस्टेप रिपेअर आणि पिकअप-ड्रॉप सेवा १९,००० पेक्षा अधिक पिन कोडमध्ये सुरू झाली असून स्क्रीन बदल, बॅटरी रिप्लेसमेंट, सॉफ्टवेअर फिक्स यांसारख्या सेवा आता घरबसल्या मिळणार आहेत तेही सहजपणे OnePlus Care अॅपमधून. ग्राहक सेवा काय असते हे OnePlus ने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे
होय, अगदी बरोबर ऐकलंत. OnePlus ने भारतभर १९,००० हून अधिक पिन कोडमध्ये डोअरस्टेप रिपेअर सर्व्हिस सुरू केली आहे. म्हणजेच आता तुमच्या OnePlus फोनला काही बिघाड झाल्यास, तुम्हाला तो दुरुस्त करण्यासाठी घराबाहेर पडावं लागणार नाही.
मुंबई आणि पुण्या सारख्या मोठ्या शहरांपासून ते अगदी लहान गावांपर्यंत ही सेवा उपलब्ध आहे. आणि तीदेखील अगदी मोफत ! समजा तुमच्या फोनला काही झाले आणि तुम्ही तक्रार नोंदवली तर वनप्लस टीम कडून तुमच्या घरी तंत्रज्ञ येईल, फोन घेईल, दुरुस्त करून पुन्हा तुमच्याच दारात परत देईल तेही सगळं अगदी व्यवस्थित आणि विश्वासार्ह प्रकारे.
समजा तुमच्या फोनची स्क्रीन फुटली आहे, चार्जिंगला प्रॉब्लेम आहे किंवा बॅटरीची गरज आहे, तर फक्त काही क्लिकमध्ये OnePlus तुमच्या घरी येईल. छोट्या-मोठ्या हार्डवेअरच्या तक्रारी, सॉफ्टवेअर अपडेट्स, आणि बॅटरी किंवा स्क्रीनची बदलही या सेवेअंतर्गत करता येतात.
पण जर तुमचा फोन पाण्यात पडला असेल, किंवा काही गंभीर हार्डवेअर प्रॉब्लेम असेल, ज्यासाठी विशेष उपकरणांची गरज आहे, तर अशा वेळी फोनला अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्येच पाठवावं लागेल. OnePlus याची आधीच कल्पना देतो, त्यामुळे काही गोंधळ होत नाही.
ही सेवा वापरणंही अगदी सोपं आहे. फक्त तुमच्या फोनवर “OnePlus Care” अॅप डाउनलोड करा. त्यात तुमच्या फोनची समस्या नोंदवा, आणि एक वेळ ठरवा. तंत्रज्ञ वेळेवर तुमच्याकडे येतो, तुमचा फोन घेऊन जातो आणि एक-दोन दिवसांत दुरुस्त करून परत आणतो. कंपनीचं आश्वासन आहे की सात दिवसांच्या आत काम पूर्ण होईल.
या सेवेचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे वेळेची बचत आणि मनःशांती. कोणतीही गर्दी नाही, रांगा नाहीत, आणि फोन हरवण्याचा किंवा बदलण्याचा धोका नाही. घरच्या घरी, तुमच्या सोयीप्रमाणे सेवा मिळते आणि तीही कंपनीच्या अधिकृत, विश्वासार्ह तंत्रज्ञांकडून.
म्हणजे आता OnePlus वापरणं ही केवळ फॅशन नव्हे, तर एक जबाबदारीनं घेतलेला निर्णय आहे, ज्यामध्ये ग्राहकाचा वेळ, सुरक्षितता आणि अनुभव याला खऱ्या अर्थानं महत्त्व दिलं जातंय. स्मार्टफोन जितका स्मार्ट, तितकीच स्मार्ट झालीय त्याची सेवा देखील!