Google Pixel 7 : तुम्ही आता स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. काही दिवसांपूर्वी गुगलने आपला नवीन स्मार्टफोन Google Pixel 7 लाँच केला होता. ज्यावर तुम्हाला आता आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत मिळत आहे.
अशी धमाकेदार संधी तुमच्यासाठी Flipkart वर उपल्बध आहे. कंपनीच्या या फोनची किंमत 59,999 रुपये इतकी आहे. परंतु 50MP कॅमेरा आणि 8GB Ram असणाऱ्या फोनवर वेगवेगळ्या ऑफरमुळे तुम्हाला तो कमी किमतीत खरेदी करता येईल. कसे ते जाणून घ्या सविस्तर.
तुम्हाला आता Google Pixel 7 हा शक्तिशाली स्मार्टफोन Flipkart सेल दरम्यान खूप कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन आता फ्लिपकार्टवर 47,999 रुपयांना लिस्ट झाला आहे. परंतु, याच्या मूळ किमतीचा विचार करायचा झाला तर हा स्मार्टफोन एकूण 59,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. यात 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध करून देण्यात आले आहे.
जाणून घ्या Google Pixel 7 वर मिळणारी बँक ऑफर
समजा आता तुम्ही Flipkart ला भेट दिली तर तुम्हाला Google Pixel 7 हा फोन 47,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. परंतु थांबा, कारण ही ऑफर इथेच संपली नाही तर काही बँक ऑफर्स देखील सूचीबद्ध करण्यात आल्या आहेत, ज्याचा वापर करून तुम्हाला आता एकूण 2000 रुपयांपर्यंतचे अतिरिक्त फायदे मिळू शकतात. इतकेच नाही तर तुम्ही तुमच्या जुन्या फोनची देवाणघेवाण करून फोनची किंमत आणखी कमी करू शकता.
Google Pixel 7 चे स्पेसिफिकेशन
कंपनीच्या Google Pixel 7 मध्ये 6.3 इंच फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये एक छोटा पंच होल कटआउट देखील मिळेल ज्यात सेल्फी कॅमेरा बसवला आहे. या फोनची बॅटरी 4270 mAh आहे. यात गुगल टेन्सर जी2 प्रोसेसर बसवला आहे.
कॅमेरा सेटअप
Google Pixel 7 च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर या फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप तुम्हाला पाहायला मिळेल. प्राथमिक कॅमेरा 50MP चा आहे तर दुय्यम कॅमेरा 12MP चा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 10.8MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.