HP ने त्यांच्या नवीन AI-आधारित लॅपटॉप्सची मालिका भारतात लाँच केली आहे. या नव्या सीरिजमध्ये एआय तंत्रज्ञान, क्लाउड क्षमताचं एकत्रीकरण आणि प्रगत कनेक्टिव्हिटी यांचा संगम पाहायला मिळतो. या पीसींमध्ये रिअल-टाइम नॉइज कॅन्सलेशन, ऑटो-फ्रेमिंगसारख्या स्मार्ट वैशिष्ट्यांसह दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि सुरक्षितता यावर भर दिला आहे.
कोणते पीसी आहेत या नवीन सिरीजमध्ये?
या AI पीसी सिरीजमध्ये HP EliteBook 8 (G1i, G1a), HP EliteBook 6 (G1q, G1a) आणि HP ProBook 4 G1q यांचा समावेश आहे. याशिवाय, HP Omnibook Ultra 14”, Omnibook 5 16”, Omnibook 7 Aero 13” आणि Omnibook X Flip 14” ही उत्पादनेही बाजारात आली आहेत. हे सर्व लॅपटॉप्स मोठ्या उद्योगांपासून ते स्टार्टअप्सपर्यंत सर्वांना लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आले आहेत.

पॉवरफुल प्रोसेसरसह कोपायलट+ अनुभव
हे पीसी Intel Core Ultra 200 V सीरिज, AMD Ryzen AI 300 आणि Qualcomm Snapdragon X Elite, X Plus यांसारख्या नव्या प्रोसेसरवर आधारित आहेत. Microsoft च्या Copilot+ चा सपोर्ट मिळाल्यामुळे AI आता संगणकाच्या केंद्रस्थानी आहे. यामुळे युजर्सना अधिक स्मार्ट आणि जलद काम करण्याचा अनुभव मिळतो.
AI फीचर्स आणि स्मार्ट कामगिरी
या नवीन लॅपटॉप्समध्ये रिअल-टाइम नॉइज कॅन्सलेशन, ऑटो फ्रेमिंग, AI-आधारित परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. ही उपकरणे प्रोफेशनल्ससाठी खास डिझाइन केली असून घरबसल्या कार्यक्षमतेने आणि सुरक्षितपणे काम करता येते. यांची बॅटरी लाईफही अधिक काळ टिकणारी आहे, जी कामाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य आहे.
भारतासाठी किंमत
HP EliteBook 8 G1i – ₹1,46,622 पासून
HP EliteBook 6 G1q – ₹87,440 पासून
HP ProBook 4 G1q – ₹77,200 पासून
HP Omnibook Ultra 14” – ₹1,86,499 पासून
HP Omnibook X Flip 14” – ₹1,14,999 पासून
HP Omnibook 7 Aero 13” – ₹87,499 पासून
HP Omnibook 5 16” – ₹78,999 पासून
HP EliteBook 8 G1a आणि EliteBook 6 G1a हे मॉडेल्स लवकरच HP च्या ऑनलाइन स्टोअरमध्ये उपलब्ध होतील.
भविष्याभिमुख टेक्नॉलॉजी
HP इंडियाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष इप्सिता दासगुप्ता यांनी सांगितले की, हे उत्पादन केवळ एक तांत्रिक टप्पा नसून, विविध उद्योगांमध्ये नवीन संधी तयार करणारे आहे. HP भारतात अधिक अर्थपूर्ण, उपयुक्त आणि भविष्याभिमुख टेक्नॉलॉजी आणण्यावर भर देत आहे.