OnePlus Phone : वनप्लसच्या अनेक मोबाईल फोन्सवर मिळत आहे जबरदस्त डिस्काऊंट, ऑफर मर्यादित कालावधीसाठी…

Published on -

OnePlus Phone : जर तुम्ही वनप्लस प्रेमी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सध्या कंपनी आपल्या अनेक फोन्सवर सूट देत आहे. अशास्थितीत तुम्ही वनप्लस कंपनीचे फोन तुमच्या बजेट मध्ये खरेदी करू शकता.

कपंनी या सेलमध्ये OnePlus 12, 12R, OnePlus Nord CE 4 आणि OnePlus Open वर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. या सेलमध्ये OnePlus Pad, Watch 2 आणि Buds Pro 2 वरही सूट जात आहे.

वनप्लसचा हा सेल 6 ते 11 जून दरम्यान चालेल. यामध्ये कंपनीच्या ऑनलाइन स्टोअर, ई-कॉमर्स साइट ॲमेझॉन आणि ऑफलाइन स्टोअर्सवर कमी किमतीत स्मार्टफोन खरेदी करता येणार आहेत. याशिवाय ग्राहकांना बँक सवलतीचा लाभही मिळू शकतो. याच्या मदतीने विक्रीपेक्षा कमी किमतीत उत्पादने खरेदी करता येतील. या सेलमध्ये या महिन्यात लॉन्च झालेल्या OnePlus 12 च्या ग्लेशियल व्हाइट कलरवर 3,000 रुपयांची सूट आणि 2,000 रुपयांचे कूपन डिस्काउंटदेखील मिळेल.

या स्मार्टफोनची खरी किंमत 64,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये Sony LYT-808 सेन्सर आणि f/1.6 अपर्चरसह 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आहे. याशिवाय, 3x ऑप्टिकल झूमसह 48-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 64-मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. त्याच्या फ्रंटला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. त्याची 5,400 mAh बॅटरी 100 W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते.

या सेलमध्ये तुम्हाला OnePlus 12 खरेदीवर 12,000 पर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि OnePlus 12R वर 6,000 पर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळवू शकता. या सेलमध्ये कंपनीच्या पहिल्या स्मार्टफोन OnePlus Open वर 5,000 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट मिळेल. जे हा स्मार्टफोन खरेदी करतात त्यांना OnePlus Watch 2 मोफत मिळेल. OnePlus 12R 39,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. या स्मार्टफोनवर 2,000 रुपयांचे कूपन डिस्काउंट आणि 2,000 रुपयांचे बँक डिस्काउंट मिळणार आहे.

तर OnePlus Nord CE 4 वर 2,000 रुपयांची बँक सूट दिली जाईल. OnePlus Pad आणि OnePlus Pad Go च्या खरेदीवर 3,000 रुपयांचे डिस्काउंट कूपन आहेत. या सेलमध्ये OnePlus Watch 2 आणि OnePlus Buds 2 Pro देखील कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News