Amazon Sale : ई-कॉमर्स कंपनी Amazonवर सध्या ग्रेट समर सेल सुरु झाला आहे. यामध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्स आणि अप्लायन्सेससारख्या अनेक उत्पादनांच्या श्रेणींमध्ये सूट दिली जात आहे. या सेलमध्ये गेल्या वर्षी लॉन्च केलेले iPhone 15 आणि त्यापूर्वीचे मॉडेलही कमी किमतीत खरेदी करता येतील. जर तुम्ही सध्या iPhone घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही वेळ उत्तम ठरेल.
अमेरिकन उपकरण निर्माता Apple च्या iPhone 15 मध्ये कंपनीची A16 Bionic चिप आहे. हे देशात 79,900 रुपये किमतीत लॉन्च करण्यात आले होते. हा स्मार्टफोन Amazon च्या सेलमध्ये 70,500 रुपयांना खरेदी करता येईल. याशिवाय, निवडक बँकांचे कार्ड वापरून खरेदीवर तुम्हाला 1,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळू शकते.
Amazonवर सुरु असलेल्या या सेलमध्ये iPhone 15 Pro मॉडेल्सवरही सूट दिली जात आहे. याशिवाय या सेलमध्ये iPhone 14 च्या 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 58,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन 69,990रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. iPhone 14 Plus मूळ किंमत 89,900 रुपयांऐवजी 79,800 रुपयांना खरेदी करता येईल.
या सेलमध्ये, ICICI बँक, वनकार्ड आणि बँक ऑफ बडोदा कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर 10 टक्के झटपट सूट देखील मिळू शकते. ॲमेझॉनच्या सेलमध्ये ग्राहकांसाठी एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही आहे. याशिवाय निवडक आयफोन मॉडेल्सवर कूपन डिस्काउंटही देण्यात येत आहे.