Flipkart Offers : iPhone 12 खरेदी करत असाल तर तपासा ‘ही’ ऑफर, होईल हजारोंची बचत…

Ahmednagarlive24 office
Updated:
Flipkart Offers

Flipkart Offers : जर तुम्ही ॲपल हँडसेटचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या शॉपिंग वेबसाईट Flipkart ॲपल हँडसेटवर मोठी सूट ऑफर करत आहे, ज्यांतर्गत तुम्ही कपंनीचे फोन अगदी स्वस्तात खरेदी करू शकता.

Flipkart सध्या iPhone 12 वर अनेक हजारांची सूट आणि अप्रतिम ऑफर देत आहे. iPhone 12 हा 5G फोन आहे आणि त्याला अलीकडेच वेगवान चार्जिंग सपोर्ट अपग्रेड मिळाला आहे.

iPhone 12 Flipkart वर 49900 रुपयांच्या किंमतीला लिस्ट झाला आहे. यावर, सध्या 13 टक्के सूट मिळत आहे, या ऑफर नंतर तुम्हाला हा फोन 42,999 रुपयांमध्ये मिळेल. याशिवाय फोनवर बँक ऑफर्सही लागू आहेत. अशातच जर तुम्ही एचडीएफसी क्रेडिट कार्ड वापरकर्ते असल्यास, तर तुम्हाला EMI व्यवहारांवर 1250 ते 1500 रुपयांची सूट मिळू शकते.

iPhone 12 वर एक्सचेंज ऑफर देखील लागू आहेत. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला 36000 रुपयांची सूट मिळेल. तुमचा पिन कोड क्रमांक टाकून तुम्ही एक्सचेंज ऑफर तपासू शकता.

iPhone 12 फोनमधील फीचर्स

iPhone 12 हा 5G फोन आहे. आजच्या काळात, जेव्हा जेव्हा ग्राहक फोन खरेदी करतात तेव्हा त्यांची पहिली अट असते 5G कनेक्टिव्हिटी. अशा परिस्थितीत हा फोन आजच्या काळातही अगदी योग्य आहे. हा फोन काही वर्षांपूर्वी लॉन्च करण्यात आला होता, पण फीचर्सच्या बाबतीत तो आजच्या लेटेस्ट हँडसेटपेक्षा कमी नाही.

फोनमध्ये सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे. तुम्हाला उच्च ब्राइटनेस आणि जबरदस्त कॉन्ट्रास्ट असलेली स्क्रीन मिळेल. चांगल्या व्हिज्युअल अनुभवासाठी यामध्ये HDR सपोर्ट देण्यात आला आहे.

फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सिस्टम आहे. तसेच 12MP वाइड कॅमेरा 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सर देखील मिळत आहेत. कॅमेराचा नाईट मोड अप्रतिम आहे. यात मॅगसेफ आहे आणि फोनला वॉटर डस्ट रेझिस्टन्स रेटिंग देखील मिळाली आहे. फोन iOS 15 वर चालतो. यात डॉल्बी व्हिजन एचडीआर रेकॉर्डिंग सिस्टम आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe