Infinix Note 40X 5G:- जर तुम्ही 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल जो उत्तम रॅम आणि शक्तिशाली कॅमेरासह असलेला तुम्हाला हवा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. इन्फिनिक्सने नोट 40एक्स 5जी लाँच केला आहे आणि तो सध्या एक उत्कृष्ट किंमतीत उपलब्ध आहे.
सुरुवातीला फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये होती आणि 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 15,999 रुपयांचा होता. मात्र फ्लिपकार्टवर सध्या हा फोन विशेष ऑफर अंतर्गत 13,999 रुपयांना उपलब्ध आहे.

बँक ऑफरचा फायदा घेतल्यास तुम्हाला 2000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते. ज्यामुळे फोनची किंमत 11,999 रुपये होईल. याशिवाय फ्लिपकार्ट एक्सचेंज बोनस देखील देत आहे.ज्यामुळे त्याची किंमत आणखी कमी होऊ शकते.
या स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये
हा फोन अत्यंत आकर्षक डिझाइनमध्ये तयार करण्यात आला आहे. त्यात 6.78-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे.जो 120Hz च्या डायनॅमिक रिफ्रेश रेटसह येतो. त्यामुळे तुम्हाला वापरताना स्मूथ अनुभव मिळतो.
फोनच्या डिस्प्लेचा पीक ब्राइटनेस 500 निट्स आहे. त्यामुळे सूर्यप्रकाशातही तुम्हाला स्पष्टपणे दिसते. त्याच्या डायनॅमिक पोर्ट फीचरमुळे अॅपलच्या डायनॅमिक आयलंडप्रमाणे तुम्हाला चार्जिंग अॅनिमेशन, कमी बॅटरी इंडिकेशन आणि फेस अनलॉकसारखी माहिती दाखवली जाऊ शकते.
कसा आहे चिपसेट?
फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 5G चिपसेटवर चालतो.जो फोनला उच्च कार्यक्षमतेचा अनुभव देतो. स्टोरेजबाबत त्यात 256GB पर्यंत यूएफएस 2.2 स्टोरेज आहे आणि 12GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आहे.
व्हर्च्युअल रॅम फिचरमुळे तुम्ही रॅम 12GB वरून 24GB पर्यंत वाढवू शकता. ज्यामुळे मल्टीटास्किंग आणि गेमिंगचा अनुभव अधिक उत्तम होतो.
कसा आहे कॅमेरा?
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एक ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 108 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे. याला क्वाड-एलईडी फ्लॅश देखील आहे. ज्यामुळे कमी प्रकाशात देखील उत्तम फोटो क्लिक करता येतात. समोर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.
फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि NFC सपोर्ट देखील आहे. आवाज अनुभव अधिक चांगला करण्यासाठी DTS ऑडिओ प्रोसेसिंगसह ड्युअल स्पीकर्स दिले आहेत. जे फोनचा आवाज शक्तिशाली करतात. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ब्लूटूथ 5.2 आणि Wi-Fi 5 यांचा समावेश आहे.
जे जलद डेटा ट्रान्सफर आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी आदर्श आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी असून जी 18W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि वायर्ड रिव्हर्स चार्जिंग सपोर्टसह येते.त्यामुळे तुम्ही लांब वेळ काम करू शकता आणि अन्य उपकरणे देखील चार्ज करू शकता.
एकूणच इन्फिनिक्स नोट 40X 5G हा एक परफेक्ट 5G स्मार्टफोन आहे जो तुमच्या सर्व गरजा पूर्ण करतो आणि हे सगळं तुम्हाला अत्यंत किफायतशीर किमतीत मिळत आहे. ज्यामुळे हा फोन बजेट फ्रेंडली 5G स्मार्टफोन चाहत्यांसाठी एक आदर्श पर्याय ठरतो.