Jio Recharge : जिओ नेहमीच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन ऑफर बाजारात सादर करत असतो. आता देखील जिओने अशीच एक ऑफर जाहीर केली आहे. ज्याच्या ग्राहकांना या महागाईच्या काळात मोठा फायदा होणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या ही योजना बाजारात धुमाकूळ घालत असून अनेकांनी आतापर्यंत याचा मोठा फायदा देखील घेतला आहे. चला मग जाणून घेऊया या दमदार योजनेबद्दल संपूर्ण माहिती.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि जिओने ग्राहकांसाठी 152 रुपयांची भन्नाट ऑफर सादर केली आहे. या रिचार्जमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसह डेटाची सुविधा देण्यात आली आहे. तसेच इतर फायदे देखील यामध्ये ग्राहकांना मिळणार आहे.
Jio 152 Recharge
Jio 152 रिचार्जची वैधता 28 दिवसांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये एकूण 14GB डेटा देण्यात आला आहे. तुम्हाला दररोज 0.5GB डेटा दिला जातो. तसेच, हा प्लान अमर्यादित कॉलिंगची सुविधा देतो आणि या कारणास्तव त्याची सर्वाधिक विक्री देखील आहे. एसएमएसबद्दल बोलायचे झाले तर प्लानमध्ये दररोज 300 एसएमएस दिले जातात. या योजनेमुळे तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. पण हे फक्त जिओ फोन वापरकर्त्यांना मिळत आहे. सबस्क्रिप्शनच्या बाबतीतही तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटीचे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. तथापि, तुम्ही या सर्व गोष्टींचा आनंद फक्त जिओ फोनमध्येच घेऊ शकता. तुम्ही देखील Jio फोन वापरकर्ते असाल तर तुम्ही ते तुमच्या यादीत समाविष्ट करू शकता.
Jio 91 Recharge
जिओ 91 रिचार्ज अशा वापरकर्त्यांसाठी फायदेशीर ठरू शकते जे कमी किमतीत अधिक लाभांसह योजना शोधत आहेत. या प्लॅनची वैधता 28 दिवसांसाठी उपलब्ध आहे. या दरम्यान तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. यासोबतच तुम्हाला या कालावधीत 50 SMS देखील मिळतात.
या प्लॅनमध्ये दररोज 100 एमबी हाय स्पीड डेटा मिळतो. तुम्ही ते सहज वापरू शकता. हा पहिला प्लान कमी किमतीत चांगला प्लान शोधणाऱ्या युजर्सची पसंती असणार आहे. कारण क्वचितच इतर कोणत्याही नेटवर्क प्रदाता इतक्या कमी किमतीत इतक्या सुविधा देतात.
हे पण वाचा :- IPL 2023: प्रतीक्षा संपली ! ‘या’ दिवशी सुरु होणार IPL 2023; ‘इतके’ संघ देणार एकमेकांना टक्कर