iPhone 13 : इतर स्मार्टफोनपेक्षा आयफोनच्या किमती खूप महाग असतात. त्यामुळे अनेकांना कमी बजेट असल्याने फोन खरेदी करता येत नाहीत. लवकरच iPhone 15 लाँच होणार आहे. परंतु त्यापूर्वी तुम्हाला iPhone 13 स्वस्तात खरेदी करता येईल.
अशी शानदार ऑफर तुमच्यासाठी Amazon ने आणली आहे. या अंतर्गत पहिल्यांदाच 30 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. परंतु जर तुम्ही अशी संधी गमावली तर तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. जाणून घ्या iPhone 13 वर मिळणारी ऑफर.
Amazon वर मिळत असणाऱ्या ऑफरमुळे कमीत कमी किंमतीत 128GB स्टोरेजसह Apple iPhone 13 चे बेस मॉडेल खरेदी करण्याची तुमच्याकडे उत्तम संधी आहे. इतकेच नाही तर या स्मार्टफोनला सर्वात मोठ्या एक्सचेंज डिस्काउंटचा फायदा वेगळा मिळत आहे, त्यानंतर त्याची किंमत आणखी कमी होईल. परंतु या ऑफरचा लाभ घेण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की त्यासाठी तुमचा जुना फोन उत्तम स्थितीत असावा.
स्वस्तात मिळेल iPhone 13
आयफोन 13 च्या बेस मॉडेलची मूळ किंमत Amazon वर 79,900 रुपये इतकी दर्शवण्यात आली आहे, परंतु 27% सवलतीनंतर तुम्हाला हा फोन 58,499 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनवर Amazon कडून निवडक कॅशबॅक ऑफर उपलब्ध करून देण्यात आली आहेत आणि ते विना-शुल्क EMI वर देखील खरेदी करता येईल.
तसेच iPhone 13 वर सर्वात मोठी सवलत एक्सचेंज ऑफरच्या रूपात दिली आहे. तुम्हाला आता त्यावर जास्तीत जास्त 31,900 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळेल. परंतु हे लक्षात ठेवा की त्याचे मूल्य जुन्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असणार आहे. तुम्हाला त्याचा पुरेपूर लाभ मिळत नसला तरीही, बेस मॉडेल मिडरेंज किमतीत घरी नेता येऊ शकतो. हा फोन ब्लू, ग्रीन, मिडनाईट, स्टारलाइट, पिंक आणि लाल रंगाच्या पर्यायांत तुम्हाला विकत घेता येईल.
कॅमेरा
खरंतर सर्व iPhone मॉडेल फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत प्रीमियम आहे. कंपनीने यात 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले दिला आहे. प्रगत ड्युअल-कॅमेरा प्रणालीमध्ये 12MP रुंद आणि अल्ट्रा-वाइड कॅमेरा लेन्स देखील तुम्हाला पाहायला मिळेल. स्मार्ट एचडीआर 4,फोटोग्राफिक स्टाइल्स, नाईट मोड, 4 के डॉल्बी व्हिजन एचडीआर रेकॉर्डिंग आणि सिनेमॅटिक मोड यासारखे कॅमेरा फीचर्स दिले आहेत.