iPhone 14 And iPhone 15 Price Drop : आयफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंद वार्ता आहे. आता आयफोनवर तब्बल 20,000 रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे. आयफोन खरेदीचे स्वप्न यामुळे स्वस्तात पूर्ण करता येणार आहे. फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग साईटवर सध्या आयफोन खरेदीवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे.
यामुळे आयफोन आपल्या मुळ किमतीपेक्षा हजारो रुपयांनी स्वस्त खरेदी करता येणे शक्य आहे. फ्लिपकार्ट हे एक लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी विविध वस्तूंवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिला जातो. यामुळे ग्राहक flipkart वरून खरेदी करण्यास विशेष पसंती दाखवतात.

दरम्यान, फ्लिपकार्ट आयफोन खरेदीवर देखील मोठा डिस्काउंट देत आहे. सध्या या ठिकाणी आयफोन 15 प्लस या लोकप्रिय हँडसेटवर तब्बल 15 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळतोय. विशेष म्हणजे हा फ्लॅट डिस्काउंट आहे.
अर्थातच यामध्ये बँकिंग ऑफरचा, क्रेडिट कार्डच्या ऑफरचा अन एक्सचेंज ऑफरचा देखील समावेश नाही. म्हणजे ग्राहकांना हा फोन थेट मूळ किमतीपेक्षा 15,000 रुपयांनी स्वस्तात मिळणार आहे. दुसरीकडे आयफोन 14 प्लस या लोकप्रिय हँडसेटवर देखील वीस हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे.
यामुळे ग्राहकांचे हजारो रुपये वाचणार आहेत. अशा परिस्थितीत आता आपण या दोन्ही मॉडेल्ससाठी फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साइटवर सुरू असणाऱ्या ऑफर संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कशी आहे ऑफर ?
iPhone 14 Plus ची ऑफर : आयफोन 14 Plus च्या 128GB व्हेरिएंटची मूळ किंमत 79,900 रुपये आहे. परंतु सध्या फ्लिपकार्टवर हा आयफोन 59,999 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच यावर फ्लॅट 19,901 रुपये डिस्काउंट दिला जात आहे.
एवढेच नाही जर तुम्हाला आणखी सूट मिळवायची असेल तर तुम्ही Flipkart Axis Bank कार्डने खरेदी करून 5% अतिरिक्त सूट मिळवू शकता. या मॉडेलवर 50,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस सुद्धा उपलब्ध आहे.
iPhone 15 Plus ची ऑफर : या हँडसेटवर देखील 15 हजार रुपयांची सवलत आहे. iPhone 15 Plus च्या 128GB व्हेरिएंटची मूळ किंमत 89,900 रुपये आहे. मात्र सध्या Flipkart वर हा आयफोन 74,999 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच या हँडसेटवर 14,901 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट उपलब्ध आहे.
जर तुम्हाला आणखी डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही Flipkart Axis Bank कार्डने खरेदी करून 5% एक्स्ट्रा सूट मिळवू शकता. तसेच, या मॉडेलवर 50,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहे.