Apple : जेव्हा जेव्हा ऍपल नवीन आयफोन लॉन्च होतो तेव्हा भारतीय लोक नवीन मॉडेलपेक्षा जुने आयफोन खरेदी करण्याचा विचार जास्त करत असतात. कारण नवीन आयफोन लॉन्च झाल्यानंतर जुन्या आयफोनची किंमत कमी होते. मात्र यावेळी अॅपल इंडियाने मोठा धक्का दिला आहे. आयफोन 14 सीरीज लाँच केल्यानंतर, कंपनीने थेट किंमत 6,000 रुपयांनी वाढवली आहे, ज्यामुळे त्यांचा जुना मोबाइल iPhone SE 2022 आणखी महाग झाला आहे.
ऐकून आणि वाचून थोडं आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे. iPhone 14 सीरीज लाँच केल्यानंतर Apple कंपनीने आपल्या जुन्या iPhone SE 2022 मोबाईलची किंमत वाढवली आहे या फोनची किंमत 6,000 रुपयांपर्यंत वाढवली आहे. अॅपलने मात्र असे करण्याचे कोणतेही कारण सार्वजनिक केले नाही.
आयफोन किती महाग आहे
iPhone SE 2022 Price in India
VARIANT OLD PRICE NEW PRICE
64GB 43,900 Rs 49,900
128GB 48,900 Rs 54,900
256GB 58,900 Rs 64,900
iPhone SE 2022 चे 64 GB स्टोरेज मॉडेल 43,900 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आले होते, ज्याची किंमत आता 49,900 रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे फोनच्या 128 GB स्टोरेज मॉडेलची किंमत 48,900 रुपयांवरून 54,900 रुपये करण्यात आली आहे आणि 256 GB स्टोरेज असलेला iPhone SE 2022 आता 58,900 रुपयांऐवजी 64,900 रुपयांना विकला जाईल.
नवीन iPhone 14 सीरीजच्या कोणत्या मोबाईलची किंमत किती आहे?
iPhone 14 ची भारतात किंमत
iPhone 14 128GB = रु. 79,900
iPhone 14 256GB = रु. 89,900
iPhone 14 512GB = रु. 1,09,900
आयफोन 14 प्लसची भारतात किंमत
iPhone 14 Plus 128GB = रु. 89,900
iPhone 14 Plus 256GB = रु. 99,900
iPhone 14 Plus 512GB = रु. 1,19,900
iPhone 14 Pro ची भारतात किंमत
iPhone 14 Pro 128GB = रु. 1,29,900
iPhone 14 Pro 256GB = रु. 1,39,900
iPhone 14 Pro 512GB = रु. 1,59,900
iPhone 14 Pro 1TB = रु. 1,79,900