iPhone 14 Price : नवीन आयफोन खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी एक मोठी बातमी हाती आली आहे. ती म्हणजे एप्पल कंपनीच्या जुन्या मॉडेलच्या किमती आता कमी होत आहेत. जसं की आपणास ठाऊकचं आहे की, दरवर्षी एप्पल आयफोन चे नवीन मॉडेल लॉन्च करत असते. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात कंपनी आपले नवीन मॉडेल बाजारात लॉन्च करते.
याही वर्षी कंपनी आयफोन चे नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे. सप्टेंबर महिन्यात कंपनी आपले लेटेस्ट आयफोन 16 हे मॉडेल ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणार आहे. अनेकजण आयफोन 16 हा लेटेस्ट फोन खरेदी करण्याच्या तयारीत आहेत.
यामुळे या फोनची अगदी आतुरतेने वाट पाहिली जात आहे. मात्र जर तुम्हाला जुन्या जनरेशनचा आयफोन खरेदी करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयफोन 16 लाँच होण्याअगोदर कंपनीने आपल्या जुन्या मॉडेलच्या किमती कमी केल्या आहेत.
यामध्ये आयफोन 14 या हँडसेटचा देखील समावेश होतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला आयफोन 14 खरेदी करायचा असेल तर हा काळ सर्वात बेस्ट ठरणार आहे. या हँडसेटच्या किमती लॉन्चिंग प्राईस पेक्षा जवळपास 20,000 रुपयांनी कमी झाल्या आहेत.
म्हणजेच आयफोन 14 खरेदीवर ग्राहकांचे हजारो रुपये वाचणार आहेत. आयफोन 14 आता 60,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत ग्राहकांना उपलब्ध होत आहे. हा हँडसेट दोन वर्षांपूर्वी लॉन्च झाला आहे. याची लॉन्चिंग सप्टेंबर 2022 मध्ये झाली होती.
तेव्हापासून या फोनच्या किमती अनेकदा कमी झाल्या आहेत. सध्या हा फोन फ्लिपकार्ट या लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाईटवर 59 हजार 999 उपलब्ध आहे. परंतु फोनची किंमत ही 69 हजार 900 रुपये एवढी आहे, जी की लॉन्च प्राईस पेक्षा दहा हजार रुपयांनी कमी आहे.
म्हणजेच फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग साइटवर हा फोन लॉन्चिंग प्राईस पेक्षा 20,000 रुपयांनी स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना उपलब्ध झाली आहे. एवढेच नाही तर फ्लिपकार्ट वरून हा फोन खरेदी केल्यानंतर ग्राहकांना एक हजार रुपयांचा बँक डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे.
ॲपलचा हा आयफोन 3 स्टोरेज ऑप्शन सह बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. 128 GB, 256 GB आणि 512 GB या 3 स्टोरेज ऑप्शनसह हा फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या तिन्ही स्टोरेज ऑप्शनवर फ्लिपकार्टच्या सेलमध्ये डिस्काउंट दिला जात आहे.