iPhone 15 Launched Date : आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी! या दिवशी लॉन्च होणार iPhone 15 सिरीज, पहा सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:
iPhone 15 Launched Date

iPhone 15 Launched Date : ॲपल कंपनीकडून भारतात दरवर्षी त्यांची पुढील सिरीज लॉन्च केली जाते. आता यावर्षी 2023 मध्ये देखील त्यांची पुढील iPhone 15 सिरीज लॉन्च केली जाणार आहे. लवकरच ग्राहकांना iPhone 15 खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.

ॲपल कंपनीकडून दरवर्षी भारतात सप्टेंबर महिन्यात पुढील सिरीज लॉन्च केली जाते. यावर्षी देखील आता iPhone 15 सिरीज सप्टेंबर महिन्यामध्ये लॉन्च केली जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

13 सप्टेंबर रोजी भारतात iPhone 15 सिरीज लॉन्च केली जाणार आहे. यावेळी ॲपल कंपनीकडून iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max ही मॉडेल सादर केली जाणार आहेत. या फोनच्या किमती लीक झाल्याचा देखील दावा करण्यात येत आहे.

पुढील महिन्यात लॉन्च होणार iPhone 15 सिरीज

2023 या वर्षात 13 सप्टेंबर रोजी ॲपल कंपनीकडून त्यांची पुढील सिरीज लॉन्च करण्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच गेल्या वर्षी ॲपल कंपनीकडून 7 सप्टेंबर रोजी लॉन्च इव्हेंट करण्यात आला होता. यावेळी iPhone 14 सिरीज सादर करण्यात आली होती.

ॲपल कंपनीकडून त्यांच्या आगामी iPhone 15 सिरीजबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. तसेच त्यांच्या आगामी iPhone 15 सिरीजची तारीख देखील जारी करण्यात आलेली नाही. मात्र 13 सप्टेंबर रोजी लॉन्च इव्हेंट आयोजित केला जाऊ शकतो आणि 15 सप्टेंबरपासून हा फोन खरेदीसाठी प्री बुकिंगसाठी उपलब्ध होईल असा देखील दावा करण्यात येत आहे.

आयफोन 15 सिरीज

आयफोन 15 सिरीजमध्ये कंपनीकडून डायनॅमिक आयलँड वैशिष्ट्ये दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये Apple A17 बायोनिक चिप दिली जाऊ शकते. iPhone 15 आणि iPhone 15 Plus या दोन्ही मॉडेलमध्ये Apple A16 Bionic चिपसेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कॅमेरामध्ये असणार बदल

आयफोन 15 सिरीजच्या सर्व फोनमध्ये कंपनीकडून 48-मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरा देण्यात येऊ शकतो. आयफोन 14 या सिरीजमध्ये फक्त प्रो मॉडेलमध्ये फक्त 48-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात येत होता. मात्र आता पुढील सीरिजच्या सर्व फोनमध्ये 48-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात येण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe