iPhone 16 Launch Date : तुम्हालाही नवीन आयफोन खरेदी करायचा आहे का ? अहो, मग एप्पल शोरूमच्या पायऱ्या चढण्याआधी ही बातमी वाचा. जगप्रसिद्ध आयफोन निर्माती ॲपल दरवर्षी सप्टेंबर मध्ये आपली आयफोनची नवीन सिरीज बाजारात लॉन्च करत असते. यंदाही हाच सिलसिला कायम राहणार आहे.
सप्टेंबर 2024 मध्ये एप्पल आयफोन १६ सिरीज बाजारात लॉन्च करणार आहे. विशेष म्हणजे आयफोन १६ सिरीज कोणत्या तारखेला लॉन्च होणार या संदर्भातही आता नवीन अपडेट समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुढल्या महिन्यात अर्थात सप्टेंबरच्या दहा तारखेला आयफोन १६ बाजारात लॉन्च केला जाणार आहे. यामुळे जर तुम्हालाही आयफोन १६ खरेदी करायचा असेल तर तुम्हाला आत्तापासूनच पैशाची जमवाजमव करून ठेवावी लागणार आहे.
विशेष म्हणजे या लॉन्चिंग सोहळ्यात कंपनी Apple Watch आणि AirPods चीही झलक दाखवणार असल्याची एक नवीन माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 10 सप्टेंबरला ॲपल 16 सिरीजचे चार नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे.
यावेळी कंपनी iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max हे मॉडेल लाँच करणार आहे. हे हँडसेट दहा तारखेला लॉन्च होणार असले तरी देखील याची विक्री 20 तारखेपासून सुरू होणार आहे. दरम्यान आता आपण या आयफोन 16 सिरीजचे फीचर्स थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे असतील फिचर्स ?
आयफोन १६ आणि आयफोन 16 प्लसमध्ये सेम साईजचे डिस्प्ले असतील पण प्रो आणि प्रो मॅक्स मध्ये मोठ्या साईजचे डिस्प्ले अन सुधारित अल्ट्रा-वाइड एंगल कॅमेरा असतील. iPhone 16 Pro मध्ये 6.3-इंचाचा डिस्प्ले असेल, तर iPhone 16 Pro Max मध्ये 6.9-इंचाचा डिस्प्ले राहील असा अंदाज आहे.
कंपनी यावेळी सर्व आयफोन 16 मॉडेल्सवर नवीन कॅप्चर बटण देखील देणार आहे, जे वापरकर्त्यांना डिजिटल कॅमेरा शटर बटणाप्रमाणेच मल्टिपलं लेव्हल प्रेशरसह फोकस आणि छायाचित्रे घेण्यास अनुमती देणार आहे.
आयफोन 15 प्रो मॉडेल्समधील ॲक्शन बटण आता आयफोन 16 लाइनअपच्या सर्व मॉडेलमध्ये उपलब्ध राहणार आहे. हे बटण फ्लॅशलाइट सक्रिय करणे, कॅमेरा किंवा शॉर्टकट लाँच करणे यासारखी विविध कार्ये करते. यावेळी बॅटरी थोडी मोठी मिळणार आहे.
आयफोन १६ आणि १६ प्लसची किंमत अनुक्रमे 79,900 आणि 89 हजार 900 इतकी राहू शकते असा अंदाज आहे. तसेच, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्सच्या किमती अनुक्रमे एक लाख 44 हजार 900 आणि एक लाख 70 हजार 900 या दरम्यान असू शकतात असा दावा केला जात आहे.
तथापि यासंदर्भात कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही. यामुळे किमती बाबतची सविस्तर माहिती ही लॉन्चिंग सोहळ्याच्या वेळीच समोर येणार आहे.