iPhone 16 Pro Discount Offer : टेक दिग्गज ऍप्पल कंपनीने अलीकडेच आपले नवीन मॉडेल बाजारात लॉन्च केले. 9 सप्टेंबरला कंपनीने आयफोन 17 सिरीज लॉन्च केली. यावेळी कंपनीने चार नवीन व्हेरियंट लॉन्च केले आहेत.
दरम्यान, नवीन सिरीज लॉन्च होताच क्षणी जुन्या सिरीजचे फोन स्वस्त झाले आहेत. यामुळे जर तुम्हाला आयफोनचे आधीचे मॉडेल खरेदी करायचे असतील तर हा काळ तुमच्यासाठी फायद्याचा राहणार आहे.

आयफोनची नवीन सिरीज लॉन्च झाली की आधीच्या मॉडेलच्या किमती कमी होत असतात. यानुसार आता आयफोनच्या जुन्या मॉडेलच्या किमती कमी झाल्या आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे सध्या नवरात्र उत्सव सुरू असल्याने अनेक लोकप्रिय शॉपिंग साइटवर डिस्काउंट ऑफर देखील दिले जात आहेत.
अमेझॉन तसेच फ्लिपकार्टवर सध्या सेल सुरू आहे आणि यामध्ये ग्राहकांना आयफोन कमी किमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आयफोन 16 च्या किमती आता हजारो रुपयांनी कमी झाल्या आहेत.
ऑनलाइन शॉपिंग साइटवर तसेच रिटेल आउटलेट मध्ये नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयफोन 16 च्या सर्वच मॉडेलवर मोठी सूट दिली जात आहे. यात सर्वाधिक सुट फ्लिपकार्टवर मिळत आहे.
या लोकप्रिय ऑनलाइन शॉपिंग साइटवर सुरू असणाऱ्या बिग बिलियन डे सेल मध्ये आयफोन 16 प्रो मॉडेलवर सर्वात जास्त डिस्काउंट दिला जात आहे. इथे iphone 16 प्रो वर ग्राहकांना तब्बल 45 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळतोय.
हा फोन एक लाख 19 हजार रुपयात लाँच झाला होता. पण आता फ्लिपकार्टवर याची किंमत 74 हजार 900 रुपये आहे. आयफोन 16 मॉडेलवर देखील ग्राहकांना मोठा डिस्काउंट दिला जात आहे.
हा स्मार्टफोन 79 हजार 999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च झाला होता. पण बिग बिलियन डेज सेलमध्ये याची किंमत 51 हजार 999 रुपये आहे. म्हणजेच या आयफोनवर देखील 28 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळतोय.
याशिवाय flipkart वर इतरही अनेक ऑफर्स सुरू आहेत. इथे कॅशबॅक ऑफर सुद्धा मिळत आहे. यामुळे जर तुम्हाला आयफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही बिग बिलियन डे सेलचा लाभ घ्यायला हवा.
अमेझॉनवर सुद्धा ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरू करण्यात आला आहे. तुम्ही या ठिकाणी आयफोन कितीला मिळतोय हे सुद्धा अवश्य चेक करायला हवे.