आयफोन 16 आजही लोकप्रिय; जगात आणि भारतात सर्वाधिक विक्रीचा दावा

Published on -

iPhone 16 : टेक्नॉलॉजीच्या दुनियेत अ‍ॅपलच्या नावाची चमक कायम आहे. वर्षभरापूर्वी लाँच केलेला आयफोन 16 आजही ग्राहकांच्या पसंतीत अव्वल असून, गेल्या वर्षी तो जगातील सर्वाधिक विक्री झालेला आयफोन ठरला आहे. भारतातही 2025 मध्ये आयफोन 16 ची सर्वाधिक विक्री नोंदली गेली.

सप्टेंबर 2025 मध्ये अ‍ॅपलने आयफोन 17 सिरीज लाँच केली, तरीही ग्राहकांचा आकर्षण आयफोन 16 कडे जास्त राहिले. या आयफोनला का इतकी पसंती मिळत आहे, याचे कारण पाहूया.

आयफोन 16 चे स्पेसिफिकेशन्स

आयफोन 16 मध्ये 6.1 इंच OLED डिस्प्ले दिला आहे, जो HDR कंटेटसाठी सपोर्ट देतो आणि 2,000 निट्सच्या पीक ब्राइटनेसला समर्थन करतो.

या डिव्हाईसला A18 प्रोसेसर दिला आहे, जो मल्टीटास्किंगसाठी आणि अ‍ॅपल इंटेलीजेंस फीचर्स सहज हँडल करण्यास सक्षम आहे. प्रोसेसर एफिशिएंट असून, येणाऱ्या सॉफ्टवेअर अपडेटसाठी पूर्णपणे कंपेटिबल आहे.

कॅमेर्‍याबाबत बोलायचे झाल्यास, रिअरमध्ये 48MP + 12MP चा डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, तर फ्रंट कॅमेर्‍यासाठी 12MP दिला आहे.

यामुळे सेल्फी, व्हिडीओ कॉलिंगसाठी उत्कृष्ट अनुभव मिळतो. बॅटरीबाबत, फुल चार्जिंगवर हा आयफोन 22 तासांचा व्हिडीओ प्लेबॅक सपोर्ट ऑफर करतो, जे प्रवास आणि मल्टीमीडिया वापरासाठी उपयुक्त आहे.

लोकांना का आवडला आयफोन 16

किंमत: अ‍ॅपलच्या लेटेस्ट मॉडेल्सच्या तुलनेत आयफोन 16 ची किंमत तुलनेने कमी आहे. त्यावर अनेक सेल्समध्ये अतिरिक्त डिस्काऊंट देखील मिळतो. त्यामुळे ग्राहकांना प्रिमियम अनुभव कमी खर्चात मिळतो.

परफॉर्मंस: A18 चिपसेटसह आयफोन 16 उत्कृष्ट परफॉर्मंस ऑफर करतो. गेम्स, अ‍ॅपल इंटेलीजेंस आणि इतर दमदार फीचर्स सहजपणे हँडल करता येतात, ज्यामुळे डिव्हाईसचा अनुभव अधिक स्मूद आणि जलद राहतो.

सॉफ्टवेअर सपोर्ट: अ‍ॅपलने जुन्या डिव्हाईससाठी सॉफ्टवेअर अपडेट्स देण्याची पद्धत सुरु केली आहे. त्यामुळे आयफोन 16 सुद्धा नवीनतम वैशिष्ट्यांसह अपडेट होत राहतो. ग्राहकांना नवीनतम आयफोनसाठी जास्त पैसे खर्च करण्याऐवजी थोडे जुने मॉडेल विकत घेणे फायदेशीर वाटते.

याच कारणास्तव, आयफोन 16 आजही ग्राहकांच्या पसंतीत अव्वल असून, 2025 आणि 2026 मध्ये देखील त्याची लोकप्रियता टिकून आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe