अँपल iPhone 16 लाँच होण्याआधीचं iPhone 17 Pro Max चे फीचर्स लीक; कसे राहणार फिचर्स? पहा…..

Tejas B Shelar
Published:

iPhone 17 Pro Max Feature : अँपलच्या आयफोनचे लेटेस्ट वर्जन खरेदी करण्याचा अनेकांचा प्लॅन आहे. यामुळे iPhone 16 सीरीजच्या लॉन्चिंगची आयफोन प्रेमींना आतुरता लागली आहे. खरंतर गेल्या काही वर्षांचा ट्रेंड पाहिला असता ॲपल आयफोनची नवीन सिरीज दरवर्षी सप्टेंबर महिन्यात लॉन्च करत असते. याही वर्षी सप्टेंबर मध्ये आयफोनची नवीन सिरीज बाजारात येणार आहे.

म्हणजे आयफोन 16 सिरीज लॉन्च होण्यासाठी अजून 2 महिन्यांचा काळ शिल्लक आहे. यामुळे आयफोन १६ सिरीज चे फीचर्स कसे असतील याबाबत नेहमीच नवनवीन अपडेट समोर येत आहे.

दरम्यान, आता आयफोन 16 सिरीजच्या लॉन्चिंगच्या चर्चा सुरू असतानाचं अंदाजे 2025 मध्ये बाजारात दाखल होणाऱ्या iPhone 17 Pro Max चे लीक्स समोर येऊ लागले आहेत.

17 Pro Max मध्ये काय-काय मेजर फीचर्स ग्राहकांना मिळू शकतात याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. यात असा दावा केला जात आहे की Apple iPhone 17 Pro Max मध्ये 48 मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स दिल्या जाऊ शकतात.

आत्तापर्यंत कंपनी 12 मेगापिक्सल सेन्सर वापरत आहे. यामुळे जर iPhone 17 Pro Max मध्ये 48 मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स दिल्या तर ॲपलच्या इतिहासातील कॅमेऱ्याबाबतचा हा सर्वात मोठा बदल ठरणार आहे.

दरम्यान, आता आपण आयफोन 16 सिरीज नंतर म्हणजेच सप्टेंबर 2025 मध्ये येणाऱ्या iPhone 17 सिरीजच्या 17 प्रो मॅक्स मध्ये काय काय फीचर्स असू शकतात याबाबत मीडिया रिपोर्ट मध्ये काय दावा केला जात आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

कसा असणार iPhone 17 Pro Max ?

आयफोन 17 प्रो मॅक्स संदर्भात एका अहवालात असे म्हटले गेले आहे की, या अपकमिंग आयफोनच्या कॅमेऱ्यामध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल पाहायला मिळणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, iPhone 17 Pro Max त्याच्या कॅमेरा सिस्टीममध्ये लक्षणीय सुधारणा करणार आहे. संभाव्यत: या अपकमिंग हँडसेटमध्ये झूमला पुढील स्तरावर नेले जाणार आहे. यासाठी यात 48MP टेट्राप्रिझम लेन्स दिल्या जाणार आहेत.

तसेच, आयफोन 17 प्रो मॅक्स 1/2.6-इंच 48MP CIS सेन्सरसह सुसज्ज राहणार आहे. जो मागील मॉडेलमध्ये वापरलेल्या 1/3.1-इंच 12MP सेन्सरपेक्षा खूपच प्रगत राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe