iPhone 17 प्रो खरेदी करायचाय? ‘ह्या’ देशात भारतापेक्षा स्वस्तात खरेदी करता येणार, किती हजारांची बचत होणार?

Published on -

iPhone 17 Pro Price : ॲपल कंपनीने नुकत्याच काही दिवसांपूर्वी कंपनीच्या एका महत्त्वपूर्ण इव्हेंट मध्ये आयफोनची नवीन सिरीज लॉन्च केली. 9 सप्टेंबरला आयफोन 17 ही सिरीज बाजारात लॉन्च झाली.

ॲपल कंपनी दरवर्षी सप्टेंबर महिन्यात आयफोनची नवीन सिरीज बाजारात उतरवते. यंदाही आयफोनची नवीन सिरीज बाजारात दाखल झाली आहे. आयफोनची नवीन सिरीज लॉन्च झाली मग कंपनीने आधीचे मॉडेल स्वस्त केलेत.

भारतात आयफोन 17 विक्रीसाठी उपलब्ध झाल्यापासून त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय. आतापर्यंत कित्येकांनी हा प्रीमियम स्मार्टफोन खरेदी केलाय. कंटेंट क्रिएटर्समध्ये या नव्या फोनची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. मुंबईतील एप्पलच्या अधिकृत स्टोअर बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी सुद्धा पाहायला मिळाली.

दरम्यान जर तुम्हीही नव्याने लॉन्च झालेला आयफोन 17 प्रो खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. कारण की आज आम्ही आयफोन 17 प्रो कोणत्या देशात भारतापेक्षा स्वस्त मिळतो याची माहिती सांगणार आहोत. 

भारतात आयफोन 17 प्रो ची किंमत किती? 

256 GB – एक लाख 34 हजार 900

512 GB – 1 लाख 54 हजार 900 

1TB – 1 लाख 74 हजार 900 

स्वस्त आयफोन कुठं मिळणार

अमेरिका 

256GB – $1,099 (₹97476)

512GB – $1,299 (₹115216)

1TB – $1,499 (सुमारे ₹132955)

दुबई

256 GB – एक लाख 13 हजार 582

512 GB – एक लाख 34 हजार 128 

1 TB – एक लाख 54 हजार 674 रुपये आहे. 

हॉंगकॉंग

256 GB – एक लाख 7 हजार 185

512 GB – एक लाख 26 हजार 572 

1 TB – एक लाख 45 हजार 960 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News