iPhone 14 Discount : अमेरिकन कंपनी एप्पल आपल्या आयफोनसाठी संपूर्ण जगात ख्यातनाम आहे. नवयुवक तरुणांमध्ये आयफोनची मोठी क्रेज पाहायला मिळते. आपल्याकडेही आयफोन असावा असे स्वप्न कदाचित तुम्हीही पाहिलेलेच असेल. मात्र बजेटमुळे जर तुम्हाला आयफोन खरेदी करता येत नसेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. विशेषता ज्यांना आयफोनचे लेटेस्ट मॉडेल आयफोन 15 खरेदी करायचा आहे अशांसाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे.
कारण की आता आयफोन 15 च्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. आयफोन 15 आता स्वस्तात खरेदी करण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. खरे तर येत्या नऊ दिवसात भारतात प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण साजरा होणार आहे. या राष्ट्रीय सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे आगामी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी ऑफर्स लावल्या जात आहेत. ई-कॉमर्स साईट अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर देखील रिपब्लिकन डे सेल सुरू झाले आहेत. दरम्यान फ्लिपकार्ट वर सुरू असलेल्या रिपब्लिकन डे सेलमध्ये आयफोन 15 वर तब्बल 14 हजार रुपयांची सूट मिळत आहे.
ऑफरमध्ये फ्लिपकार्टवर कितीला मिळतोय आयफोन 15
आयफोन 15 ची किंमत 79,999 रुपये एवढी आहे. मात्र फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या रिपब्लिकन डे सेलमध्ये याची किंमत 17 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फ्लिपकार्टच्या रिपब्लिकन डे सेलमध्ये आयफोन 15 फक्त आणि फक्त 65 हजार 999 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आला आहे. म्हणजेच हा फोन मूळ किमतीपेक्षा जवळपास 14 हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे.
विशेष म्हणजे यावर एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळवता येणार आहे. यामुळे ग्राहकांना हा फोन खूपच स्वस्तात खरेदी करता येणे शक्य होणार आहे. निश्चितच जर तुम्हाला आयफोन 15 खरेदी करायचा असेल आणि तुमच्याकडे 66 हजाराचे बजेट असेल तर तुम्ही हा आयफोनचा लेटेस्ट मॉडेल या रिपब्लिकन डे सेलमध्ये खरेदी करू शकणार आहात.